पुणे : मनसे पुणे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुुळे राज्यातील मनसे पक्षात सध्या आलबेलचं चित्र निर्माण झालं आहे. मनसेतून पायउतार व्हावं लागल्याने वसंत मोरे यांना राज्यातील विविध पक्षांच्या ऑफर आल्याच्या देखील त्यांनी सांगितलं. परंतु मी शेवटपर्यंत मनसेत राहणार असं सांगत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी काल केलेल्या व्यक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
वसंत मोरे, साईनाथ बाबर यांची चाय पे चर्चा! शहराध्यपदी निवड झाल्यानं केलं अभिनंदन
वंसत मोरे आणि रूपाली पाटील यांचे विचार वेगवेगळे आहेत. गेल्या 15 वर्षापासून मी नेतृत्त्व करतोय. मी सामान्य नागरिकांमधील कार्यकर्ता आहे. ज्या भागामधून मी निवडून येतो, तिथे वसंत मोरे या वैयक्तिक नावा भोवती एक वलय आहे. दक्षिण पुण्यातील लोक वसंत मोरेला मानतात. त्यामुळेच 2017 च्या निवडणुकीत माझ्या प्रभागातील तीन वॉर्डांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले. एका वॉर्डात वसंत मोरेचा विजय झाला. मी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मनसेचा बालेकिल्ला तयार केला आहे. त्यामुळे माझ्याबाबतीत राजकीय हत्या किंवा आत्महत्या शक्य नाही. असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
“दादा..! जिथे कुठे असाल तिथून परत या ;” चंद्रकांत पाटलांच्या आठवणीत कोथरुडकरांची बॅनरबाजी
रमजानचे दिवस आहेत. तुम्ही भोंगा लावणार का? असा प्रश्न विचारला असता. त्यांनी मी राज साहेबांचा आदेश डावलला असा त्याचा विपर्यास काढण्यात आला. न कोणत्याही परिस्थित मी पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे तुम्हीही पक्ष सोडू नका. आत्तापर्यंत चार राजीनामे झाले आहेत. त्यामुळे त्यांचा मी आदेश धुडकावला नाही. मी एक सर्वसामन्य कार्यकर्ता असून राज ठाकरे यांचा बनला बॅनर देखील मीच लावला आहे.
“ते आम्हाला ठार मारतील, त्याची तयारी आहे, मात्र पुढील 25 वर्ष भाजप सत्तेत येणार नाही”
दरम्यान, पुणे शहराध्यक्ष पदांवरून हाकाल पट्टी झाल्याने रूपाली पाटील यांनी त्यांची जूनी आठवण सांगितली. मी मनसेतून राष्ट्रवादीत येताना तुम्ही म्हणाला होतात, तुझी राजकीय आत्महत्या असेल, पण वसंत भाऊ आता तुमची पक्षाने तर हत्या केली की, असं म्हणत त्यांनी वसंत मोरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर ते म्हणाले की माझी ही राजकीय हत्या नाही आणि आत्महत्या देखील नाही, अंसही त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- 16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला अन् डोळ्यात पाणी आलं! मनसे उपाध्यक्षांनी दिला राजीनामा
- राष्ट्रवादीसह मुख्यमंत्र्यांचा देखील वसंत मोरेंना फोन! शिवसेनेत येण्याचं केलं आव्हान
- यशंवत जाधवांना आयकर विभागाचा झटका ! 40 मालमत्तांवरसह 26 फ्लॅट्सवरही जप्तीची कारवाई
- कोल्हापुरची निवडणुक सोपी समजून घोडचूक करू नका; चंद्रकांत पाटलांचा ‘मविआ’ इशारा
- संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? भाजप नेत्याचा राऊतांना सवाल