मुंबई : एसटीचं विलिनीकरण न करण्यामागे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच सुत्रधार असल्याचं सांगत आज एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येने शरद पवारांच्या बंगल्यावर त्यांनी दगडफेक आणि चप्पला फेकल्या. त्यामुळे त्याठिकाणी मोठ्या गोंधळ्याचं वातावरण तयार झालं. त्यावर आता राज्यातील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आंदोलनामागे काही अज्ञात व्यक्तींचा समावेश असल्याचं सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या बंगल्यावर चपला अन् बांगड्या फेकल्या
धनजंय मुंडे म्हणाले की, पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजूनं उतरलेले आहेत. कुठलंही आंदोलन नेत्याच्या घरापर्यंत गेललं नाही. या सरकारनं जे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतले ते कुणीच घेतलेले नाहीत. घरावर दगड फेकून, चप्पल फेकुन प्रश्न सुटणार नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. या कर्मचाऱ्यांना कदाचित हा इतिहासही माहीत नाही का ? की अनेक वर्ष आपली हयात घातली आणि त्यांच्याच घरावर झालेलं हे आंदोलन संशयास्पद आहे.
“वसंत मोरेंचं पद गेल्यामुळे मनसेत फटाके वाजलेत अन् तात्या ढसाढसा रडले”
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, एकीकडे जल्लोष झाला आझाद मैदानात आणि दुसरीकडे चिथावणीखोर भाषणं सुरू होती. लोकशाहीचा गळा चिरडून मारण्याचं काम सुरू आहे की काय? असा हा प्रकार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना जे काही मिळालं ते पवार साहेबांच्या मध्यस्थीमुळे मिळालं हे षड़यंत्र आहे. याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे पवार साहेब आमचं दैवत आहेत. देशाच्या राज्याच्या माणसासाठी त्यांनी आयुष्य वाहिलं असंही ते म्हणालेत.
वसंत मोरेंच्या हकालपट्टीनंतर पुण्यात मनसेला गळती; पदधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांनी खळबळ
दरम्यान, एसटी विलिनीकरणाच्या मुद्य़ावर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. न्यायालयाने दिलेला निर्णय अन्यायकारी असल्यानं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलिनीकरणार न होण्यामागचे सुत्रधार असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारने 124 एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
Read also:
- पवार साहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय? जयंत पाटलांचा सवाल
- ‘पॉलिटिकल महाराष्ट्र’ च्या वृत्ताला महापालिका आयुक्तांच्या निर्णयाने पुष्टी; अण्णा बनसोडे ‘पॉलिटिकल कॉर्नर’च!
- “अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण चिघळवत आहे”; राऊतांची एसटी आंदोलनावर प्रतिक्रिया
- शरद पवारांच्या घरांवरील हल्ला ठरवून करण्यात आला; दोषींवर कारवाई होणार: गृहमंत्री
- 50 वर्षातील राजकारणाचा काय उपयोग? संन्यास घ्या; नितेश राणेंचा शरद पवारांवर निशाणा