कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या प्रचारतोफा अखेर आज थंडावल्या आहेत. काल प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने महाविकास महाविकास आघाडी भारतीय जनता पक्ष दोघांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन केले. महाविकास आघाडी कडून अतिविराट रॅलीचे नियोजन करण्यात आले होते तर भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये न भूतो न भविष्यती अशी सभा घेतली.
“माझी हत्या होऊ शकते”! न्यायालयात नेण्याआधी सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य
कोल्हापूर उत्तरेची निवडणूक लागल्यापासून शिवसेना नाराज होती असं बोललं जातं होतं. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपली ही खंत पक्ष नेतृत्वाला बोलून दाखवली होती. त्यानंतर बराच काळ नाराजी नाट्य सुरु होते, मात्र अखेरीस खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिल्यानंतर राजेश क्षीरसागरांचे बंड पुन्हा शांत झाले.
एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला! परिवहनमंत्र्यांनी दिला ‘हा’ कडक इशारा
काल कोल्हापूर उत्तरेच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी त्यांनी राजेश क्षीरसागरांना पुन्हा आमदार करण्याचे संकेत दिले. अरे राजेश ठिक आहे, गेल्यावेळी काँग्रेस जिंकली, यावेळी काँग्रेस जिंकेलं. पण युती आणि आघाडी म्हटल्यानंतर पुढे एकत्र जाताना काही घडामोडी घडतात. त्यामुळे पुढे जे काही करायचे आहे ते करायला आपण आहोत ना, बघु कोण मध्ये येते, असं म्हणत त्यांनी स्पष्ट संकेत देऊन टाकले.
भ्रष्टाचारावरून नेत्यांवर गरळ ओकणारे सोमय्या थेट ‘नॉट रिचेबल’; INS विक्रांत प्रकरण भोवणार
एवढंच नाही तर भाजपने मागच्या विधानसभा निवडणुकीत कसा धोका दिला हे देखील तितक्याच प्रखरतेने समोर आणले. २०१४ साली शिवसेनेला ६९ हजार ७३६ मत तर भाजपला ४० हजार १०४ मत आणि काँग्रेसला मिळाली ४७ हजार ३१५ मत मिळाली होती. २०१९ ला भाजपसोबत युती असूनही भाजपचे १ हजार ही मतदान पडले नाही. भाजप कसा सापाप्रमाणे काम करत होते याचे उदाहरण एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी देऊन टाकले. देशाच्या, राज्याच्या आणि कोल्हापुरच्या हितासाठी जे करायचं ते आम्ही उघडपणे करतो. पाठींबा दिला तर उघडपणे, नडलो तरी उघड्पणेच. आम्ही सत्तेसाठी भाजपप्रमाणे हपापलेले नाही, त्यामुळे जयश्री जाधव यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सभेत चांगलीच गर्दी झाली होती.
Read also:
- तर त्याच्या दुप्पट चोप आम्ही पण देऊ! राष्ट्रवादीचा मनसेला इशारा
- सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी! शरद पवारांच्या बंगल्यावरील प्रकरण भोवणार
- एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला! परिवहनमंत्र्यांनी दिला ‘हा’ कडक इशारा
- “आज एसटी कर्मचाऱ्यांचा मृतदेह आढळला? एक ना एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार”
- राजकीय वातावरण तापलं! पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची बैठक