पुणे : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मनसेतील राजकीय घडामोडींना आज अखेर पुर्णविराम दिला आहे. मनसेचे पुणे शहराचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांंच्यासोबत नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर देखील उपस्थित होते. त्यामुळे या भेटीनंतर मी पुर्णपणे समाधानी असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
“आम्ही सत्तेसाठी भाजपप्रमाणे हपापलेले नाही”! उद्धव ठाकरेंचा भाजपविरूद्ध एल्गार
गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणानंतर राज ठाकरे यांच्यावर चहुबाजूंनी टिका झाली होती. त्यामुळे ठाणे येथे होणारी उद्याच्या सभेत विरोधकांना य़ावर प्रत्युत्तर देणार आहेत. त्या सभेकडे सध्या सगळ्याचं लक्ष आहे. या सभेत राज ठाकरे हे विरोधकांना प्रत्यत्तरादाखल मनसेची आगामी भूमिका देखील मांडणार आहे.
तर त्याच्या दुप्पट चोप आम्ही पण देऊ! राष्ट्रवादीचा मनसेला इशारा
मी माझ्या साहेबांसोबत. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही. मी पहिल्यापासून सांगत आलो आहे की, मी शेटवपर्यंत मनसेतच राहणार आहे. उद्या ठाण्यात राज ठाकरे यांची सभेत सभा होत आहे. त्या सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. त्यामुळे मला साहेबांनी सांगितलं की उद्या तु सभेत ये. त्यामुळे मी देखील त्या सभेला जाणार आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मी पुर्ण समाधानी असल्याचंही वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.
सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी! शरद पवारांच्या बंगल्यावरील प्रकरण भोवणार
दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या संबंधित भुमिका मांडली होती. त्यावर मुस्लिम समाज नाराज झाल्याने अनेक मुस्लिम मनसेच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. तर वसंत मोरे यांचं देखील यावरून शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आलं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसापासुन राज्यात मनसेतील राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं.
Read also:
- शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागील मुख्य सुत्रधार शोधा; काॅंग्रेस नेत्याची मागणी
- भाजपच्या हुकुमी एक्काला अटक होणार! न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष
- मनसेला धक्क्यावर धक्के! धुळ्याच्या उपमहानगर प्रमुखांनी दिला राजीनामा
- कोल्हापूर उत्तरेचे मैदान कोण मारणार? भाजपसह बंटी पाटलांनीही लावली ‘टाईट फिल्डिंग’
- “फुलेंना भारतरत्न मिळेपर्यंत शांत बसणार नाही”; काॅंग्रेस नेत्याची केंद्र सरकारकडे मागणी