मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे काही नेते महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात काही मंत्र्यांवर, आमदारांवर, खासदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताहेत . यामध्ये सर्वात पुढे किरीट सोमय्या यांचं नाव आहे . किरीट सोमय्या सातत्याने विशेषतः शिवसेनेच्या मुंबईमधील नेत्यांना टार्गेट करतांना दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याविरोधात ईडीला किरीट सोमैय्या यांनीच पुरावे दिले. त्यानंतर संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. संजय राऊत यांच्या अलिबागमधील काही जमिनी ईडीने जप्त केल्या आणि यानंतर एक किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये एक राजकीय युद्ध सुरु झालं. ते युद्ध म्हणजे किरीट सोमैय्या विरुद्ध संजय राऊत यांच्यातील भ्रष्टाचार उघडं पाडण्याचं युद्ध.
सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी! शरद पवारांच्या बंगल्यावरील प्रकरण भोवणार
युद्धाचा पहिला भाग किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना अटक व्हावी यापासुन सुरु झाला.संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी खूप प्रयत्न केलेत. मात्र संजय राऊतांवर विशेष अशी काही कारवाई झाली नाही. दुसरीकडे संजय राऊत यांनी थेट दिल्लीतून एक बॉम्ब फोडला आणि हा बॉम्ब होता ‘आयएनएस विक्रांत बचाव’ मोहिमेचा. या बचाव मोहिमेत किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र निल किरीट सोमय्या यांनी गोळा केलेला निधी राजभवनाकडे आलाच नाही आणि त्याचा पुरावाही संजय राऊत यांनी समोर आणला. लगेचच चक्रे फिरली आणि किरीट सोमय्या यांना अडचणीत आण्यासाठी माजी नौदल सैनिकांनी ट्रॉमबे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. भ्रष्टाचारावरून समोरच्याला चारी मुंड्या चित करणारे किरीट सोमय्या यावेळी पत्रकारांना उत्तरही देत नव्हते हे विशेष.
एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला! परिवहनमंत्र्यांनी दिला ‘हा’ कडक इशारा
यानंतर किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलीस तपासाची चक्रे पुन्हा एकदा फिरवण्यात आली आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास देण्यात आला. मागच्या काळात जेव्हा जेव्हा किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर आण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भाजपच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना खूप साथ दिली. मात्र या प्रकरणात भाजपच्या एकही बड्या किंवा छोट्या नेत्याची साधी प्रतिक्रियाही आली नाही. किरीट सोमय्या यांच्याविरोधात समन्स बजावण्यात आले होते, मात्र ते दिल्लीत असल्याने उपस्थित राहू शकले नाही.
“आज एसटी कर्मचाऱ्यांचा मृतदेह आढळला? एक ना एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार”
आज किरीट सोमय्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे. त्यावर जर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला तर किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील नेत्यांवर टार्गेट करत आहेत. त्यामुळे भाजपचा हुकुमाचा एक्का असणाऱ्या किरीट सोमय्याला जर अटक झाली तर भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे. तसेच याचा फायदा महाविकास आघाडी सरकारला देखील होऊ शकतो. कारण येत्या काही महिन्यांवर महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून जी महाविकास आघाडीवर टिका टिप्पणी, आरोप- प्रत्यारोप होत आहे त्याची थोडीशी धार कमी होऊन महाविकास आघाडीला पुढचं रान मोकळं होऊ शकतं. त्यामुळेच आज होणाऱ्या सुनावणीकडे महाराष्ट्राचं सर्व लक्ष लागून आहे.
Read also:
- मनसेला धक्क्यावर धक्के! धुळ्याच्या उपमहानगर प्रमुखांनी दिला राजीनामा
- कोल्हापूर उत्तरेचे मैदान कोण मारणार? भाजपसह बंटी पाटलांनीही लावली ‘टाईट फिल्डिंग’
- “फुलेंना भारतरत्न मिळेपर्यंत शांत बसणार नाही”; काॅंग्रेस नेत्याची केंद्र सरकारकडे मागणी
- “आम्ही सत्तेसाठी भाजपप्रमाणे हपापलेले नाही”! उद्धव ठाकरेंचा भाजपविरूद्ध एल्गार
- तर त्याच्या दुप्पट चोप आम्ही पण देऊ! राष्ट्रवादीचा मनसेला इशारा