मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता आहे. विक्रांच बचाव मोहिमे अंतर्गत गोळा केलेला निधी राजभवनाला मिळालाच नसल्याचं सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याप्रकरणावरून किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भाजपच्या हुकुमी एक्काला अटक होणार! न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष
मागील दोन ते तीन दिवसांपासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, किरीट सोमय्या हा पळून जाणारा नेता नाही. पळवणारा नेता आहे. त्यांच्यावर न्यायालयात प्रक्रिया सुरू आहे. तो लपणारा नेता नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
मनसेला धक्क्यावर धक्के! धुळ्याच्या उपमहानगर प्रमुखांनी दिला राजीनामा
प्रवीण दरेकरांना आज मुंबै बॅंक निवडणुक प्रकरणी चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. मी पहिल्या दिवसांपासून सांगत आलो आहे की, आमचा पक्ष लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. आम्ही संजय राऊतांसारखे आक्रासतळे नाहीत. त्यांना चौकशीसाठी बोलवलं तेव्हा त्यांनी जो नंगा नाच केला होता. ते सर्व आपण पाहिलं आहे. मी जेव्हा चौकशीसाठी बोलवतं आहेत. तेव्हा तेव्हा मी जातोय. जी माहिती मी अर्ध्या तासात देऊ शकतो. त्यासाठी मला वारंवार बोलवलं जात आहे. हा सुडाच्या भावनेतून छळवाद सुरू आहे. मात्र आम्ही कायद्याला प्रतिसाद देण्यास तयार आहोत, असंही ते म्हणालेत.
कोल्हापूर उत्तरेचे मैदान कोण मारणार? भाजपसह बंटी पाटलांनीही लावली ‘टाईट फिल्डिंग’
दरम्यान, किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र निल सोमय्या यांच्यावर ट्राॅंम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर त्यांनी अटकपुर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी सोमय्यांच्या जामिनाला विरोध केल्याची माहिती सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी दिली. त्यामुळे सोमय्यांना जामीन मिळणार की नाही, याची उत्सुकता लागली आहे. किरीट सोमय्याांनी जमा केलेली रक्कम कुठे गेली याचा पोलिसांना तपास करायचा आहे. या चौकशीसाठी आरोपीची कोठडी हवी आहे. मात्र आरोपी म्हणतायत आम्ही हा पैसा आमच्या पक्षाकडे दिला आहे. या सगळ्या प्रकारात पक्ष जर आरोपी आढळला तर पक्षाच्या नेत्यावर पण कारवाई करण्यात येईल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- “मनसेला जवळ केल्यास फटका बसू शकतो, याचा अंदाज भाजपला आला असेल”; जयंत पाटलांचा टोला
- ..तर पक्षांवर देखील कारवाई होईल; विक्रांत प्रकरणावरून सरकारी वकिलांनी दिला इशारा
- मुख्यमंत्र्यांनी मला संधी दिली, मात्र घाणेरड्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला; संजय राठोड
- “साहेबांनी सांगितलं की, उद्या तु सभेला ये, भेटीनंतर मी समाधानी”; वसंत मोरे
- शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागील मुख्य सुत्रधार शोधा; काॅंग्रेस नेत्याची मागणी