पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देश सावरतो आहे. अशातच भीती निर्माण झाली आहे ती दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची. हा व्हेरिएंट घातक असल्याने त्याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न संबोधण्यात आलं आहे. लसी या व्हेरिएंटवर किती प्रभावी ठरतात? या प्रश्नाची चर्चा होते आहे. अशात कोव्हिशिल्ड या ओमिक्रॉनवर प्रभावी आहे का? याचं उत्तर अदर पूनावाला यांनी दिलं आहे.
एकाही शेतकऱ्याच्या मृत्यूची नोंद नाही, त्यामुळे मदतीचा प्रश्नच नाही – मोदी सरकार
जगभरात जनजीवन पूर्ववत होत असताना ओमिक्रॉन व्हायरसच्या व्हेरिएंटने थैमान घालण्याची सुरूवात केली आहे. यावर कोव्हिशिल्ड प्रभावी आहे का? हे येत्या दोन-तीन आठवड्यात समजेल असं अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे. ओमिक्रॉन हा विषाणू किती गंभीर हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र ओमिक्रॉन पाहता बूस्टर डोस शक्य आहे असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
सरकारने दोन डोस पूर्ण करण्यावर आता भर दिला पाहिजे. लवकरात लवकर हे लक्ष्य पूर्ण केलं पाहिजे असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं. कोव्हिशिल्ड ही लस कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी सक्षम होती. तसंच रूग्णालयात दाखल होण्याची आणि मृत्यू होण्याची शक्यताही या लसीमुळे कमी होते असं लॅन्सेटच्या अहवालातही नमूद करण्यात आलं होतं. कोव्हिशिल्डचा ओमिक्रॉन व्हेरिएंटवर कसा परिणाम होतो. ही लस या व्हेरिएंटसाठीही प्रभावी ठरते का? हे पाहण्यासाठी आपल्याला किमान तीन आठवडे वाट बघावी लागेल. ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांनी यावर संशोधन सुरू केलं आहे असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- वीज काय फुकटात तयार होते का? वीज बिल भरावचं लागेलं; उर्जामंत्र्याची शेतकऱ्यांना तंबी
- ममता बॅनर्जींची सिल्हर ओक’वर हजेरी; भेटीनंतर शरद पवारांनी सांगितली २०२४ ची रणनिती
- राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला धक्का; ‘या’ बड्या नेत्यासह अनेक जण बांधणार ‘घड्याळ’
- शिवसेनेची ताकद वाढणार; वैभववाडीत अनेकांनी हाती बांधले शिवबंधन !
- ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल; तिसऱ्या आघाडीवर होणार चर्चा?