औरंगाबाद : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२० च्या वेगवेगळ्या मतदारसंघात आता सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीनं त्यांचे उमेदवार जाहीर केले असून यावेळीही काही जणांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळं आजही उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत.
भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असं विधान भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडेंनी केलं आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. एका व्यक्तीचं तिकीट कापून मी शिरीष बोराळकर यांच्या कार्यक्रमाला आले, त्यामुळे जो काही मेसेज द्यायचा तो मी दिला आहे. असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. सर्व वर्गांना समान न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. माझ्यावर पक्षाचे आणि बापाचे संस्कार आहेत. त्यामुळे मी पूर्ण काम करेन, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.
Read Also :
…खरा खेळ तर आता सुरू झाला आहे, अर्नब गोस्वामीचे ठाकरेंना आव्हान
‘महाविकास आघाडीच्या आपसातील कुरबुरीच हे सरकार पडण्यास कारणीभूत ठरतील’
पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक : राष्ट्रवादीला बसणार बंडखोरीचा फटका?
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक, कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार?