पुणे : भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पुण्यात पत्रकारपरिषदेत राज्यातील महिला व मुलींवरील अत्याचारांच्या वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यांनतर काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधताना, शूर्पणखा असा उल्लेख केला होता. या टिप्पणीबद्दल माध्यमांनी चित्रा वाघ यांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी “मला असं वाटतं की पुणेकरांची मराठी मुंबईकरांपेक्षा वीक आहे” असं देखील म्हटलं.
शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती – शरद पवार
या मुद्य्यावर बोलताना चित्रा वाघ यांनी सांगितले की, “ शूर्पणखा म्हणजे कुणाचं नाव थोडीचं शूर्पणखा आहे. मी तर उपमा दिली होती की रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको. रावण तर खूप फिरत आहेत. तीन तर रावण मीच तुम्हाला सांगितले. असे खूप आहेत त्यामुळे त्यांना मदत करणारी शूर्पणखा नको. हे काय कुणा एखाद्या व्यक्तिला म्हटलेलं नाही? कुणाचं नाव शूर्पणखा आहे का? मी असंच म्हटलं.. की कुणी पण बसवा शूर्पणखा बसवू नका. तीन पक्षाचं सरकार आहे, तुम्ही कुणालाही बसवा पण शूर्पणखेला बसवू नका. शूर्पणखा काय आहे? रावणाला मदत करणारी ती शूर्पणखा. जे मला माहिती आहे. बहीण जरी असेल आणि चुकीचा कामात रावणाला मदत करत असेल, तर ते कसं काय चालेल आम्हाला? म्हणून म्हटलं मी. कुणाचं नाव शूर्पणखा असेल किंवा ठेवलं असेल पुण्यामध्ये तर मला कळवा.”
प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांची पत्रकार परिषद https://t.co/HKP1ACNvab
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 24, 2021
तसेच, “अजुन तर कुठे बॅटींग सुरू झाली आहे, आता ती शिकू द्या समजू द्या. नंतर बोलू की आम्ही. शूर्पणखा आहे की नाही हे येणाऱ्या दिवसात समजेल. ते नाही बोलले तरी आम्ही आहोतच. मला हे म्हणायचं आहे की अजुन कामकाज काही कुठे दिसलं नाही. एकदा जर एखाद्याला कुठलं काम दिलं तर त्याला शिकायला त्याला दोन महिने दिले पाहिजे. करू देत त्यांनी काम. तिथं शूर्पणखा नको म्हणजे रावणाला मदत करणारी नको. हे माझं म्हणणं आहे. तिथे बसलंय कोण हे महत्वाचं नाही. ते संविधानिक पद आहे. त्या संविधानिक पदाची गरीमा मला माहिती आहे मी काम केलंय महिला आयोगामध्ये. ते पद अतिशय आदाराचं आणि मानाचं आहे. म्हणूनच मी म्हटलं की अशा संविधानिक पदावर शूर्पणखा देऊ नका, म्हणजेच रावणाची बहीण देऊ नका, जी रावणाला मदत करते आणि राज्यात तर रावणच रावण फिरत आहेत सगळ्या ठिकाणी. जर त्यांनाच मदत करणारी शूर्पणखा आली तर राज्यातील महिलांचं काय होणार? हा त्याचा आशय होता.” असं चित्रा वाघ यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Read Also :
- चार महापालिका पोटनिवडणूकीचा धुरळा; 21 डिसेंबरला पार पडणार मतदान
- आागामी महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार; नाना पटोलेंची घोषणा
- पुण्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस; भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा
- ‘तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो’; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
- रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुरेश लाड यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा