पुणे : येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी राज्यातील प्रमख नेत्यांनी पुण्यात तळ ठोकलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह , इतर मंत्री आणि राजकीय पक्षांचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानार उतरले आहेत. कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुका भाजप आणि महाविकास आघाडीसाठी महत्तवाच्या ठरल्या आहेत. यातच काल काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कसब्यात रवींद्र धंगेकरांसाठी रॅली काढून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा..सोसायटीधारकांसाठी भाजपाचे ‘रेड कार्पेट’ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘मायक्रो कॅम्पेनिंग’
उपस्थितीत लोकांना मार्गदर्शन करतांना प्रणिती शिंदे म्हणाले की, तुम्ही तर काॅंग्रेसला कसब्यात आणलं तर तुमचाच फायदा होणार आहे. त्यामुळे याचा तुम्ही विचार करा. आपल्या देशात पहिल्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा आपण गौरव करतो. परंतु भाजपने महिलांना कुठंही स्थान दिलं नाही. आपल्या खात्यामधून भाजपचे लोक पैसे काढून घेतात. अन् दुसऱ्या बाजूला हाच आपला पैसा मोठ मोठ्या उद्योगपतींना देतात. आपल्या मुलांना नोकरी नाहीत. त्यामुळे आता आपल्याला काॅंग्रेसलाच परत आणावं लागेल. असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
हेही वाचा…चंद्रकांत पाटलांचं पोटनिवडणुकांबाबत सूक्ष्म नियोजन, थेट घरात जाऊन रासनेंचा प्रचार
याठिकाणी जर काॅंग्रेसचा उमेदवार निवडून आला तर आपण सुरक्षित आहोत. नाहीतर भाजपवाले आपल्या घरात येऊन सगळेच घेऊन जाणार. त्यासाठी तुम्हाला रवींद्र धंगेकरांना निवडून आणावं लागेल. असंही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, आमदार कुणालबाबा पाटील, यांच्यासह काॅंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी लोहियानगर परिसरात महिलांची रॅली काढून प्रचार केला.
Read also
- हेही वाचा..“उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याला उद्धवस्त केलं जात असेल तर मी स्वस्थ बसणार नाही” शरद पवार
- हेही वाचा…“शिट्टी ला बॅट ने उत्तर,” चिंचवडमध्ये अपक्षांनी अपक्षाला धो धो धुतलं
- हेही वाचा..विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला
- हेही वाचा..“सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची ‘सर्वोच्च’ सुनावणी”,ठाकरेंच्या वकिलांनी शिंदेंना अडचणीत पकडले
- हेही वाचा.“नेता नाही तर बेटा म्हणून काम करण्याची इच्छा”, अपक्ष उमेदवार सिद्धिक शेख