पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदानाची तारिख जशी जशी जवळ येत आहे. तसा राजकीय पक्षांचा प्रचाराचा जोर वाढलेला दिसून येत आहे. भाजपकडून अश्विनी जगताप तर महाविकास आघाडीकडून नाना काटे मैदानात आहेत. यातच राहुल कलाटे यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. यातच आता अपक्ष उमेदवार ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी राहुल कलाट्यांवर टिका केली आहे.
हेही वाचा..“कसब्यात हेमंत रासनेंचा विजय निश्चित, उदयन राजेंचा मतदारांवर विश्वास”
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून किशोर आत्मराम काशीराम यांना उमेदवारी दिली आहे. शोषित घटक, बेरोजगार, मजूर, राज्यभरात होत असलेले अन्या, अत्याचार, महिला सुरक्षा, दोन्ही व्यवस्थेकडून धोक्यात आलेले संविधान वाचवण्यासाठी सर्व घटकांना प्रश्नांना न्याय देण्यासाठी, आंबेडकरवादी राजकीय अस्तित्व निर्मितीसाठी लढा असल्याचं म्हणत ही पोटनिवडणुक लढवित असल्याचं किशोर काशीराम यांनी म्हटलं आहे. किशोर काशीराम हे या पोटनिवडणुकीत बॅट या चिन्हांवर निवडणूक लढवित आहेत.
हेही वाचा..“तर अंबादास दावनेंचं विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येऊ शकतं”
यातच महाविकास आघाडीने राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली नाही. त्यानंतर राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून शिट्टी या चिन्हावर निवडणुक लढवत आहेत. त्याआधी बॅट मिळावी नाही म्हणून आमच्याविरोधात जोरदार बिल्डिंग लावण्यात आली. असं राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे. त्यावर एक लाख मतदान घेणारा, तसेत तीन टर्म उमेदवार असलेला उमेदवार बॅट मिळावी नाही म्हणून बिल्डिंग लावण्यात आल्याचं म्हणत आहे. त्यांनी आमचा असाच प्रचार करीत राहावं. असं पक्ष उमेदवार ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार असलेल्या शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली”
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, त्यांनी बॅट बॅट म्हणत राहवं. आम्ही बिल्डिंग लावलेली नाही. ते काम तुमचं आहे. निवडणुक आयोग बिल्डिंग करण्याच काम करीत नाही. इतक्या वेळेस उमेदवार राहिलेल्या उमेदवाराला इतकं माहीत नसेल तर हे त्यांचं अज्ञानपण आहे. त्यामुळे आम्ही याची तक्रार निवडणुक आयोगाकडे करणार नाही. तुम्ही आमचा प्रचार करत रहा. असा टोलाही त्यांनी राहुल कलाटे यांना लगावला.
Read also
- हेही वाचा..विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला
- हेही वाचा..“सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची ‘सर्वोच्च’ सुनावणी”,ठाकरेंच्या वकिलांनी शिंदेंना अडचणीत पकडले
- हेही वाचा.“नेता नाही तर बेटा म्हणून काम करण्याची इच्छा”, अपक्ष उमेदवार सिद्धिक शेख
- हेही वाचा..सोसायटीधारकांसाठी भाजपाचे ‘रेड कार्पेट’ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘मायक्रो कॅम्पेनिंग’
- हेही वाचा…चंद्रकांत पाटलांचं पोटनिवडणुकांबाबत सूक्ष्म नियोजन, थेट घरात जाऊन रासनेंचा प्रचार