IMPIMP
bjp bjp

दम असेल तर फिल्मसिटी युपीत नेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचं योगींना ओपन चॅलेंज

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खुलं आव्हान दिलं आहे. हिम्मत असेल तर मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशात नेऊन दाखवावी, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी उत्तर प्रदेशात बनवणार असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यानाथ यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. मुंबईतील फिल्मसिटी हलवण्याच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप आमने-सामने आली आहे.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं आयोजित केलेल्या ऑनलाईन चर्चासत्राचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर मुंबई फिल्मसिटीमध्ये आधुनिक सुविधा लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून योगी सरकारच्या फिल्मसिटी उभारण्याच्या घोषणेवर भाजपवर खोचक टीका करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे चित्रिकरण आणि चित्रपटांचे प्रदर्शन बंद असताना योगीजींनी नव्या फिल्मसिटीची संकल्पना मांडली.

 

Read Also :

सत्यजीत तांबेंनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडे केली ‘ही’ मागणी

सुजय‌ विखेंकडून पंतप्रधान,मुख्यमंत्र्यांसह बड्या नेत्यांना दिवाळीचे ‘हे’ खास गिफ्ट

रोहित पवारांच्या यशासाठी ‘मातोश्रीं’नी कसली कंबर; ‘सुनंदा पवार’ उतरल्या मैदानात

‘कराल काय स्वतःला अटक??? न्या स्वतःला फरफटत’ , राणेंचा ठाकरेंवर  हल्लाबोल