कोल्हापूर: कोल्हापुरात उत्तर भागात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. कोल्हापूर उत्तर भागात आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता निवडणूक होणार असून कालपासून अर्ज भरण्यास सुरु झाली आहे आणि अंतिम मुदत २४मार्च आहे. मतदान १२ एप्रिल रोजी होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार; रश्मी शुक्ला प्रकरणावरून पटोलेंचा इशारा
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघडीमध्ये खटके उडण्याची शक्यता आहे. पालकमंत्री सतेज(बंटी) पाटील यांनी काँग्रेसला जागा मिळावी असं म्हटलं आहे तर शिवसेनेकडून माजी आमदार राजेश क्षीरसागर हे इच्छुक आहेत. राजेश क्षीरसागर यांचा मागील निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांनी पराभव केला होता.
दिशा सालीयन प्रकरणी राणे पिता पुत्राला जामीन मंजूर होताच; नितेश राणेंचा राज्य सरकारवर पलटवार
दुसरीकडे भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचे ठरवले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा केली आहे . त्यानंतर आज फडणवीस इच्छुकांची यादी घेवून दिल्लीत जाणार असून तिथूनच उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे असं देखील बोललं जात आहे.
“कुठं मरगळ आली असेल तर झटकून टाकावी”; शिवसेनेचे 22 मार्चपासून शिवसंपर्क अभियान
काँग्रेस पक्षाकडून सर्व बाबींमध्ये चाचपणी सुरु आहे. मागील काही काळात शिवसेनेकडे हा मतदारसंघ गेल्याने काँग्रेसला शिवसेनेला सोबत घ्यावेच लागणार आहे. दुसरीकडे भाजपने पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला धक्का दिला होता, त्यावरून काँग्रेसने उत्तरेत जोरदार तयारी केली असल्याचे बोलले जात आहे.
प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा दणका; मुंबै बॅंक निवडणुक प्रकरणी याचिका फेटाळली
काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. कोल्हापूर उत्तरेत शिवसेनेची ताकद बघता हिंदुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार उभे करण्याचे मनसुबे काँग्रेसने जाहीर केले आहेत. आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
काश्मिर पंडितांची वेदना जेवढी शिवसेनेला माहित आहे, तेवढी अन्य कुणालाही नाही: संजय राऊत
“जी-23 म्हणजे काॅंग्रेसचे सडके कांदे”; संजय राऊतांची काॅंग्रेसवर खरमरीत टीका