मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या “लोक माझी सांगाती” या पुस्तकाचे सुधारीत प्रकाशन मंगळवारी पार पडले. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडत असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. यावरून सध्या राज्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आज राष्ट्रवादीची यावरून बैठक होत असून यात दोन प्रस्ताव मांडले आहेत. यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुचक ट्विट केलं आहे.
हेही वाचा…फॅक्ट चेक : निगडीतील शिवसृष्टीला तर महाविकास आघाडीच्या काळातच ‘खोडा’
संजय राऊत यांनी सकाळी सकाळी शुभ सकाळ सांगत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, राजकारणात अपघाताने काहीच घडत नाही. जर असं घडत असेल तर त्या दृष्टीने ती घटना नियोजित केलेली असते. यावर मी पैज लावू शकतो, असं राऊतांनी म्हटलं आहे. राऊताच्या या ट्विटनंतर राज्याच्या राजकारणात शंकाचं काहुर माजलं आहे.
हेही वाचा…शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली! मोठी घोषणा करताच राष्ट्रवादीच्या नेत्यांना अश्रू अनावर
अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून चर्चिल्या जात आहेत. यातच महाविकास आघाडी टिकावी, तसेच अजित पवार हे राष्ट्रवादीसोबतच राहावं, यासाठी शरद पवार यांनी राजीनाम्यासंदर्भात खेळी केली आहे. असा चर्चा देखील राज्याच्या राजकारणात एका कोपऱ्यात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…Big News: शरद पवार यांचा मोठा निर्णय, अध्यक्षपदावरुन निवृत्ती
दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या मुंबई पक्षाकार्यालयात शरद पवारांच्या राजीनाम्यासंदर्भात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. पहिल्या प्रस्तावात शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. तर दुसऱ्या प्रस्तावात शरद पवार हेच अध्यक्षपदी राहावं असं सांगण्यात आलं आहे.
Good morning! pic.twitter.com/lOKUTZFRWx
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…Breaking: शरद पवारांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस समितीचा महत्त्वाचा निर्णय! कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
हेही वाचा…“मी पुन्हा येईन, तो कसा येतो, ते तुम्हाला….”, तापलेल्या राजकारणात फडणवीसांचं सुचक विधान
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अॅक्शन प्लॅन तयार, पुढचा अध्यक्ष ठरला, बैठकीत दोन प्रस्ताव ?”
हेही वाचा…अजित पवारांना धक्का : हवेली बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘सुपडा साप’
हेही वाचा…‘आता लोकांची खात्री पटली, राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवली’