मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झालेला नाही. त्यावरून विरोधक सातत्याने सत्ताधारी पक्षावर टिका करताना दिसत आहेत. यातच मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान न दिल्याने त्यावरूनही शिंदेंवर निशाणा साधला जात आहे. अशातच आता शिंदे सरकारमधील एका आमदारांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख सांगितली आहे.
“त्यावेळी मग ममता बॅनर्जी मुंबईत गोट्या खेळायला आल्या होत्या का?” भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर
राज्यात आता मंत्रिमंडळाचा विस्तार करावाच लागणार आहे. येत्या 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 15 जानेवारीपर्यंत यामधील तांत्रिक अडचणी दुर होतील. त्यामुळे येत्या 20 ते 22 तारखेच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असा अंदाज बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त केला आहे.
“आम्ही पण तयार आहोत”, असं म्हणत नितेश राणेंचा राष्ट्रवादीला इशारा
सुरूवातीला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गटाचे 9 ते भाजपचे 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये अपक्ष आणि महिला आमदारांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात महिला आणि अपक्ष आमदारांना स्थान देण्याची शक्यता आहे.
आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात..! अपघातात गाडीचा चक्काचूर, मोठा अनर्थ टळला
दरम्यान, संजय शिरसाठ यांनी यानिमित्ताने संजय राऊतांवर देखील टिका केली आहे. शिवसेनेत जो सकाळचा भोंगा सुरू आहे. त्यामुळे शिवसेना येत्या 8 ते 10 दिवसांत रिकामी होणार आहे. शिवसेनेत उरलेले आमदार शिंदे गटात लवकरच सामील होतील. अन् जर भविष्यात निवडणुका लढवयाच्या की नाही असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा राहिल, असंही भाकित संजय शिरसाठ यांनी व्यक्त करून दाखवलं आहे.
Read also
- “शिंदे सरकार सध्या व्हेंटिलेटर, हे काढलं की सरकारचं राम नाम सत्य है…!”
- मोशी टोलनाका : सर्वपक्षीयांचा विरोधामुळे खासदार अमोल कोल्हेंची अडचण! केंद्रीय मंत्र्यांशी जवळीक पण मतदारांवर अन्याय?
- “ते ऐकलं तर उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील”; नारायण राणेंचा राऊतांना इशारा
- मोठी बातमी…! शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरली, या तारखेला विस्तार होणार ?
- शिंदे, ठाकरे अन् फडणवीस एकाच मंचावर येणार…! शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच मोठी राजकीय घडामोड