मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली. अन् माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॅकपुट पडले. त्यानंतर राज्यात ठाकरे आणि शिंदे यांच्यात जोरदार राजकीय लढाई बघायला मिळाली. यातच आता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी नेमकं काय घडणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
“आता काश्मीरला जाण्याची गरज राहणार नाही, मुंबईत 521 एकर फिल्मसीटी उभारणार”; सुधीर मुनगंटीवार
येत्या 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जंयती आहे. त्यानिमित्ताने विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात येणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे निमंत्रण स्विकारणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
“त्या ऊर्फीला पण यावर नाचवा”..! त्या प्रकरणावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
या कार्यक्रमाला सिनेअभिनेते अमिताभ बच्चन, पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यासह अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. यावेळी जर उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण स्विकारलं तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे सत्तांतरणानंतर पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
दरम्यान, यावेळी भाषणात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची बॉडी लॅग्वेज काय असणार, तेही पाहण्यात एक वेगळी आतुरता कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. यावरून हिंदू ह्दयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित्त मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. वा म्हणजे टोमण्यांचा पाऊस पडणार असं म्हणत भाजप आमदात अतुल भातखळकर यांनी डिवचलं आहे.
Read also
- “त्यावेळी मग ममता बॅनर्जी मुंबईत गोट्या खेळायला आल्या होत्या का?” भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर
- “आम्ही पण तयार आहोत”, असं म्हणत नितेश राणेंचा राष्ट्रवादीला इशारा
- आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात..! अपघातात गाडीचा चक्काचूर, मोठा अनर्थ टळला
- “याला म्हणतात, काखेत कळसा आणि गावाला वळसा”; म्हणून, राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल
- “तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णुचा अवतार म्हणतात, त्यामुळे आम्ही..;”भुजबळांचं भाजपला प्रत्युत्तर