मुंबई : मागील काही दिवसापासून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला आहे. यावरून आता चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यावरून आता रूपाली चाकणकर यांनी यावर भाष्य केलं आहे.
काल चित्रा वाघ यांनी माध्यमांना खोटी माहिती दिली. अनुराधा बेवसिरीजच्या पोस्टरवरून राज्य महिला आयोगाने तेजस्विनी पंडीतला कोणतीही नोटीस पाठवली नाही. याबाबत आम्ही अनुराधा वेबसिरीजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. आम्हाला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ही नोटीस पाठवली असून दिग्दर्शक म्हणून तुमची स्पष्ट करावी, असे निर्देश या नोटीसद्वारे देण्यात आले होते. त्यानंतर संजय जाधव यांनी आयोगाला त्यासंबंधित उत्तर दिले. मात्र, यादरम्यान कुठेही तेजस्विनी पंडीतचा उल्लेख नव्हता. असं रूपाली चाकणकर यांनी दिले आहे.
अनिल देशमुखांप्रमाणे नवाब मलिक तुरूंगातून बाहेर केव्हा येणार? कार्यकर्त्यांची प्रतिक्षा आणखी वाढली
रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महिला आयोग गेल्या 30 वर्षापासून काम करते आहे. आयोगाची गरिमा मोठी आहे. अनेक कतृत्ववान स्त्रियांनी महिला आयोगासाठी काम केलं आहे. त्यामुळे स्व: च्या प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे खोटे आरोप करणाऱ्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगाने नोटीस बजावली आहे, अशी माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा महिला आयोग कारवाई करेन असंही त्या म्हणाल्या.
Read also
- “माझा स्वभाव वाईट, संजय राऊतला सोडणार नाही, त्याच्यावर केस टाकेन”, नारायण राणे भडकले
- राष्ट्रवादीचा भाजपला दणका, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज नावाचे 10 हजार स्टिकर अजित पवारांच्या हस्ते प्रकाशन
- “त्यांनी मला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे….;” बच्चू कडूंचा राज्य सरकारला घरचा आहेर
- “तो बोलत राहिला तर त्याला पुर्ण नागडा करीन”; संजय राऊतांचा नारायण राणेंवर संताप
- “राज्याला उर्फीमध्ये अडकडवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले”