सिंधूदुर्ग : राज्यात मागील काही दिवसापासून छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून वाद सुरू आहे. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं तर विरोधकांनी अजित पवारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यातच मग राष्ट्रवादीने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आशा आशायचे स्टीकर अजित पवारांच्याच हाती प्रकाशित केले. त्यावर आता भाजपने देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं काल पुण्यात राष्ट्रवादीमार्फत जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीने स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असे जवळपास 10 हजार स्टीकर्स अजित पवारांच्या हस्ते मोटारसायकल व इतर ठिकाणी लावण्यात आले. यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजप नेते नितेश राणे यांनी देखील आम्ही पण तयार आहोत. असं म्हणत एक व्हिडीओ ट्विटवर अपलोड केला आहे.
“माझा स्वभाव वाईट, संजय राऊतला सोडणार नाही, त्याच्यावर केस टाकेन”, नारायण राणे भडकले
नितेश राणे यांनी ट्विटवर टाकलेल्या व्हिडीओमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशा ठळक अक्षरातील स्टीकर्स दिसत आहेत. व त्यात आम्ही पण तयार आहोत. असं म्हणत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे आता राज्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दोन दिवसापुर्वी अजित पवार यांनी नितेश राणे यांचा उल्लेख टिल्ल्या म्हणून केला होता. त्यानंतरही नितेश राणे यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि नितेश राणे यांच्यात जोरदार टिका टिप्पणी होतांना दिसत आहे.
आम्ही पण तयार आहोत …
“धर्मवीर” छत्रपती संभाजी महाराज की जय !!! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @cbawankule pic.twitter.com/MwyvPwQVFj
— nitesh rane (@NiteshNRane) January 6, 2023
Read also
- आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात..! अपघातात गाडीचा चक्काचूर, मोठा अनर्थ टळला
- “याला म्हणतात, काखेत कळसा आणि गावाला वळसा”; म्हणून, राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल
- “तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णुचा अवतार म्हणतात, त्यामुळे आम्ही..;”भुजबळांचं भाजपला प्रत्युत्तर
- “आता काश्मीरला जाण्याची गरज राहणार नाही, मुंबईत 521 एकर फिल्मसीटी उभारणार”; सुधीर मुनगंटीवार
- “त्या ऊर्फीला पण यावर नाचवा”..! त्या प्रकरणावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया