मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलिकडेच मुंबई दौरा केला. यावेळी मुंबईतील फिल्मसीटी उत्तर प्रदेशात जात आहे असा असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यावर आता राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
“तो बोलत राहिला तर त्याला पुर्ण नागडा करीन”; संजय राऊतांचा नारायण राणेंवर संताप
उत्तरप्रदेशमध्ये फिल्मसिटी होणार की नाही ते माहीत नाही. मात्र मुंबईमध्ये 521 एकर जमिनीवर जगातील सर्वात चांगली व अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली फिल्म सीटी तयार होणार आहे. यासाठी एक खिडकी योजना देखील आणली जाणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
“राज्याला उर्फीमध्ये अडकडवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले”
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुंबई विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांसाठी व्यवस्था विकसित करण्याचा विचार आहे. विमानतळावर 104 स्केअर किमीचा पार्क आहे, त्याला विकसीत करणार आहे. फिल्म सीटी येथेच राहावी, चित्रपट निर्माते इतर ठिकाणी जाऊ नये यासाठी प्रयत्न करतो आहेत. त्यासाठी एक खिडकी योजना आणली आहे. असंही स्पष्टीकरण मुनंगटीवार यांनी दिलं आहे.
चित्रिकरणाच्या परवानगीसाठी आता वन क्लिकवर सर्व ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहेत. राज्यात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी 65 पर्यटन स्थळ विकसित करणार असून त्याठिकाणी सोयी सुविधा निर्माण केल्या जातील. चित्रीकरणासाठी काश्मीरला जाण्याची गरज राहणार नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “त्या ऊर्फीला पण यावर नाचवा”..! त्या प्रकरणावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
- “चित्रा वाघ यांनी दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा कारवाई होईल”; उर्फी अन् वाघ यांच्या वादात चाकणकर
- “माझा स्वभाव वाईट, संजय राऊतला सोडणार नाही, त्याच्यावर केस टाकेन”, नारायण राणे भडकले
- राष्ट्रवादीचा भाजपला दणका, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज नावाचे 10 हजार स्टिकर अजित पवारांच्या हस्ते प्रकाशन
- “त्यांनी मला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे….;” बच्चू कडूंचा राज्य सरकारला घरचा आहेर