नाशिक : मागील काही दिवसापासून राज्यात महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं आहे. विरोधी पक्ष यावरून सातत्याने सत्ताधारी पक्षावर टिका करत आहेत.यातच शरद पवार यांना देखील जानता राजा म्हणण्यावरून वाद सुरू आहे. यातच जो जनतेचं प्रश्न सोडवतो, त्यांना जाणता राजा म्हणायला काय अडचण? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले. त्यानंतर त्यांच्यावर पुन्हा टिका करण्यात आली. त्यावर मोदींना विष्णुचा अवतार म्हटलं जातं त्यावर काय म्हणावं, असं म्हणत त्यांनी विरोधकांना अडचणीत टाकलं आहे.
“त्यांनी मला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे….;” बच्चू कडूंचा राज्य सरकारला घरचा आहेर
शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यात अडचण काहीच नाही. असे अनेकजणांना अशा पदव्या दिल्या जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही जण विष्णुचा अवतार म्हणतात. त्यावर आम्ही काय म्हणालो का ? असा सवाल करत ठिक आहे, तुम्हाला ते विष्णुचा अवतार वाटत असेल तर म्हणा तुम्ही. त्यावर आमचं काहीचं म्हणणं नाही. गोरगरीबांचा एक जाणता राजा असतो, म्हणून पवार साहेबांना आम्ही जाणता राजा म्हणतो, असंही स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
“तो बोलत राहिला तर त्याला पुर्ण नागडा करीन”; संजय राऊतांचा नारायण राणेंवर संताप
तसेच पुढे म्हणतांना ते म्हणाले की, माझा डोळा विरोधी पक्षावर आहे असं तुम्ही म्हणत आहेत. माझा कशावरच डोळा नाही, माझा डोळा फक्क त्या बावनकुळेंवर आहे. मला राजकारणात 56 वर्ष झालं आहे. त्यामुळे आम्हाला काही गोष्टी दुसऱ्यांनी सांगयाच्या नाहीत. असं म्हणत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा समाचार घेतला.
“राज्याला उर्फीमध्ये अडकडवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले”
दरम्यान, शरद पवार यांना जाणता राजा म्हटल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांच्यावर प्रखर शब्दात टिका केली होती. त्यावरून छगन भुजबळांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Read also
- “आता काश्मीरला जाण्याची गरज राहणार नाही, मुंबईत 521 एकर फिल्मसीटी उभारणार”; सुधीर मुनगंटीवार
- “त्या ऊर्फीला पण यावर नाचवा”..! त्या प्रकरणावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
- “चित्रा वाघ यांनी दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा कारवाई होईल”; उर्फी अन् वाघ यांच्या वादात चाकणकर
- “माझा स्वभाव वाईट, संजय राऊतला सोडणार नाही, त्याच्यावर केस टाकेन”, नारायण राणे भडकले
- राष्ट्रवादीचा भाजपला दणका, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज नावाचे 10 हजार स्टिकर अजित पवारांच्या हस्ते प्रकाशन