नाशिक : शिवसेनेच्या 16 आमदारांविरोधात अपात्रतेचा खटला सध्या कोर्टात सुरू आहे. न्यायव्यवस्थेवर कोणताही दबाव आला नाही तर निकाल आमच्या बाजूने लागणार. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. त्यामुळे हे सरकार लवकरच पडणार असा पुर्नउच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काढले आहे.
“आम्ही पण तयार आहोत”, असं म्हणत नितेश राणेंचा राष्ट्रवादीला इशारा
राज्यातील शिंदे सरकार सध्या व्हेंटिलेटरवर असून त्याचा निकाल लवकरच लागणार आहे. हे व्हेंटिलेटर काढलं की सरकारचं राम नाम सत्य है. असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे सरकारवर भाष्य केलं आहे. तसेच अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून होतं. सरकारमध्ये दोन गट आहेत. तुमचं तुम्ही बघा, आमचं बघणं सुरू आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात..! अपघातात गाडीचा चक्काचूर, मोठा अनर्थ टळला
राज्यात 2024 ची तयारी सुरू आहे. त्याआधीच परिवर्तन होईल. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. माझं मत पक्कं आहे. आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव येईल. असं वाटत नाही. संविधान घटना आणि कायद्याचं उल्लंघन करणारं सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही. 16 आमदार अपात्र ठरतील. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- मोशी टोलनाका : सर्वपक्षीयांचा विरोधामुळे खासदार अमोल कोल्हेंची अडचण! केंद्रीय मंत्र्यांशी जवळीक पण मतदारांवर अन्याय?
- “ते ऐकलं तर उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील”; नारायण राणेंचा राऊतांना इशारा
- मोठी बातमी…! शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरली, या तारखेला विस्तार होणार ?
- शिंदे, ठाकरे अन् फडणवीस एकाच मंचावर येणार…! शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच मोठी राजकीय घडामोड
- “त्यावेळी मग ममता बॅनर्जी मुंबईत गोट्या खेळायला आल्या होत्या का?” भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर