मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील अपक्ष आमदार गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांना भेटून राजकीय पक्ष मत वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच आज विधान परिषदेच्या निवडणुकीकरीता मतदानाच्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे.
“मी पुन्हा येईन”, रोहित पवारांनी काढली फडणवीसांची जुनी आठवण
येणारा काळ हा छोट्आ पक्षाच्या आमदारांचा आणि अपक्ष आमदारांचा असणार आहे. कारण निवडणुकीत दिवसेंदिवस त्यांचं वजन वाढत आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल. महाविकास आघाडीच्या बाजूला राहून दुसऱ्या पक्षाला याचा फटका बसेल, असं सुचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. त्यानंतर यामध्ये मुख्यमंत्री कुणाचा असेल, या प्रश्नांवर त्यांनी पुढचा मुख्यमंत्री हा प्रहारचा असेल अशी टिप्पणी केली आहे.
“गद्दारी करून सत्तेत आलेल्या सरकारला आमदार योग्य उत्तर देणार”
हम बोलेंगे वैसे ही सरकार चलेगा. अपक्षांचा झटका काय असतो आणि परिणाम कसे असतील ते विधान परिषद निवडणुकीत दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही निवांत राहा. असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. तसेच मी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असून महाविकास आघाडीचे सहाच्या सहा उमेदवार निवडून येणार आहेत. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
“भाजपला सत्तेबाहेर काढण्यासाठी काॅंग्रेसला सहयोग करा”; अग्निपथ योजनेवरून पटोलेंचं तरूणांना आवाहन
दरम्यान, बहुजन विकास आघाडीकडे तीन मत असून काल प्रवीण दरेकर, काॅंग्रेसचे भाई जगताप, राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. संख्याबळानुसार भाजपचे चार तर महाविकास आघाडीतील पाच उमेदवार सहज निवडून येतील. मात्र दहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
Read also:
- “भाजपचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला”; खडसेही उपस्थित, राजकीय वर्तुळात चर्चा
- “सेनेला मतदान देण्यासाठी माझ्यावर मुख्यमंत्र्यांकडून दबाव”; रवी राणांचा गंभीर आरोप
- “पंकजा मुंडे अन् नाथाभाऊंची झालेली गळचेपी याचा फटका भाजपला बसणार”
- “उमेदवार निवडून आल्यास संजय राऊत काय बोलणार ते आता मी पाहणार”; देवेंद्र भुयार
- “मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा”; भाजपच्या नेत्याचं सुचक वक्तव्य