मुंबई : मुंबईत क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे यांच्यासह भाजप नेत्यांवर निशाणा साधला . भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावरही मलिक यांनी अनेक आरोप केले. यानंतर कंबोज यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबईतील माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नवाब मलिक यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.
संसदेतील बारा खासदारांच्या निलंबनावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या… ‘हा’ तर रडीचा डाव
यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारसह मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले. ठाकरे सरकारचे मंत्रिमंडळ आहे की Bail बाजार? असा उलट सवाल करत अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला . दरम्यान क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मलिक यांनी भाजप नेते मोहित कंबोज आणि त्यांच्या मेहुण्यावर आरोप केले आहे. या आरोपांमुळे माझी आणि माझ्या मेव्हण्याची बदनामी झाल्याचा दावा कंबोज यांनी करत मुंबईतील माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा ठोकला.
हे मंत्रिमंडळ आहे की Bail बाजार? @mohitbharatiya_ pic.twitter.com/cUhVfYF3pU
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 30, 2021
मलिक यांच्या वक्तव्यामुळे तक्रारदाराच्या प्रतिमेला तडा गेल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ५०० (मानहानी) अंतर्गत मलिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Read Also :
- शिवसेनेला मिळणार नवा मित्रपक्ष? ममता बॅनर्जींसोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची महत्त्वाची बैठक
- पुण्यात 15 डिसेंबरला शाळा सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर
- “आ देखें ज़रा किसमें कितना है दम”; नवाब मलिक यांचे प्रवीण दरेकरांना आव्हान
- निलंबनाच्या कारवाईवरून खासदार प्रियांका चतुर्वेदींनी व्यक्त केला संताप