मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांना आता मुश्रीफांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांवर 100 कोटीचा दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसंच चंद्रकांत पाटील यांच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना खोचक सवाल केला आहे. दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का? असा प्रश्न पाटील यांनी केला आहे.
मोठी बातमी: हसन मुश्रीफांनी केला १२७ कोटींचा भ्रष्टाचार, किरीट सोमय्यांचा पुराव्यानिशी आरोप
हॅब्रीड अॅन्यूईटी मध्ये ३० हजार कोटीची कामं निघाली. सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्ष 60 टक्के आणि 40 टक्के अशी ती कामं होती, त्याचं टेंडर निघालं, काम पूर्ण होत आहेत. हॅब्रीड अॅन्यूईटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झालेत. ती मग थांबवायला हवी होती, का थांबवली नाहीत? मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही. मी जसं म्हटलं, मी घाबरत नाही, त्यांनीही म्हणावं. कितीही कोटीचा दावा केला तरी दावा करण्यासाठी 25 टक्क्याची स्टॅम्प ड्युटी लागते, तेवढा व्हाईट मनी आहे का? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.
माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझं नाव घेऊन त्यांना झोप लागत असेल तर बरं आहे. ते नेहमी 100 कोटीच्या दाव्याच्या बाता करतात, त्यापेक्षा जास्त दावा ठोका. त्यांचं सरकार येऊन 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला. त्यांना कुणी रोखलंय? माझ्यावर खुशाल तक्रार करा, कुठेही करा. मी कशाला घाबरत नाही, असा दावाही पाटील यांनी केलाय.
Read Also :
- गायिका म्हणून नव्हे तर, राजकीय नेत्याची बायको म्हणून लोक माझ्याकडे बघतात – अमृता फडणवीस
- ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुका ओबीसी विरुद्ध ओबीसीच होणार!’ वडेट्टीवारांचं विधान
- अनिल परबांच्या अडचणीत वाढ; वांद्रे येथील अनधिकृत कार्यालयावर बुलडोझर फिरवण्याचे आदेश
- भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला पैशांची ऑफर दिली होती; आमदार पाटील यांचा गौप्यस्फोट
- साताऱ्यात भाजपला धक्का : आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकानी हातावर बांधले घड्याळ