नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत, आगामी स्थानिक स्वजय संस्थांच्या निवडणुका आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय होऊ देणार नाही! असे सर्वांचे एकमत झाले. मात्र, त्यांनतर ११ सप्टेंबरला न्यायालायने निकाल देऊन, ‘निवडणुका पुढे ढकलण्याचा, तसेच वेळापत्रक ठरवण्याचा आधिकार फक्त निवडणूक आयोगाला असून, तो राज्य सरकारला नाही,’ असं स्पष्ट केलं. त्यामुळे, आता सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला.
‘बाळासाहेब थोरातांची भूमिका योग्यच, राष्ट्रवादीने काँगेसमध्ये विलीन व्हावं!’
या पार्श्वभूमीवर आज, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, ‘आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ओबीसी विरुद्ध ओबीसीच होतील. त्या ओबीसी विरुद्ध ओपन अशा होणार नाहीत. ओबीसी समाज स्वतःच्या हक्कांबाबत प्रचंड जागृत झाला आहे. त्यामुळे सगळ्या पक्षांना याच मार्गाने जावं लागेल. त्यातच त्यांचं भलं आहे. नाहीतर त्यांना महागात पडेल,’ असा इशारा दिला आहे.
मोठी बातमी : OBC आरक्षणाशिवायच जिल्हा परिषद निवडणूक होणार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती
तसेच, ‘आरक्षणाशिवाय निवडणुकांची चर्चा, केवळ ५ जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे. मागच्या वेळी निवडणूक आयोगाने पत्रं पाठवून कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती मागवली होती. त्यावेळी फैलावामुळे निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. आम्ही तशी विनंती केली होती. त्यामुळे यावेळीही सप्टेंबरच्या शेवटी तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता, जिल्हाधिकारी वस्तुनिष्ठ माहिती देतील. पण आरक्षणाशिवाय निवडणुका नको,’ असं मत त्यांनी मांडलं.
‘आता निवडणुका घ्याव्याच लागणार?’, न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका
‘आरक्षण वगळून कुणालाही पुढे जायचं नाही. ओबीसींच्या जागेवर इतर कुणाला ना उभं करणं सर्वच पक्षाला महागात पडणार आहे. त्यामुळे, पुढे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची वेळ आली, तर सर्वच पक्षांनी ओबीसींच्या आधीच्या आरक्षित जागेवर उमेदवार असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसची देखील तीच भूमिका आहे. याबाबत आम्ही सर्व पक्ष मिळून रणनीती ठरवणार आहोत. सरकारच्या अधिकारात जे येते त्यानुसार निर्णय घेतला जाईल. आम्ही २-३ पर्यायांवर काम करू,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- अनिल परबांच्या अडचणीत वाढ; वांद्रे येथील अनधिकृत कार्यालयावर बुलडोझर फिरवण्याचे आदेश
- भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला पैशांची ऑफर दिली होती; आमदार पाटील यांचा गौप्यस्फोट
- साताऱ्यात भाजपला धक्का : आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकानी हातावर बांधले घड्याळ
- शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचे खुले आवाहन
- उद्धव ठाकरेंनी भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही; काँग्रेस नेत्याबद्दल चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट