नागपूर : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसमध्ये सामील होण्याची जाहीर ऑफर दिली होती. ‘पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं,’ असं ते म्हणाले होते. त्यांनतर आता त्यांच्या या भूमिकेला मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील समर्थन दिले असून, ‘त्यांनी मांडलेली भूमिका अगदी योग्य असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
अनिल परबांच्या अडचणीत वाढ; वांद्रे येथील अनधिकृत कार्यालयावर बुलडोझर फिरवण्याचे आदेश
‘खरंतर सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. राष्ट्रवादी तर काँग्रेसच्याच विचारधारेतून वेगळा झालेला पक्ष आहे. त्यामुळे आपसात मतभेद आणि टोकाची भूमिका ठेऊन, एकमेकांना दुखावण्यापेक्षा व एकमेकांच्या विरोधात बोलण्यापेक्षा एकत्रं आलेलं कधीही चांगलं. आपण एकाच विचारधारेचे आहोत. त्यामुळे, बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्यच आहे. पवारांनी राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये घेऊन यावं आणि शक्ती वाढवावी,’ असं ते म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला पैशांची ऑफर दिली होती; आमदार पाटील यांचा गौप्यस्फोट
यावेळी, ओबीसींच्या आरक्षणाबद्दल बोलताना, ‘आरक्षण वगळून कुणालाही पुढे जायचं नाही. ओबीसींच्या जागेवर इतर कुणाला ना उभं करणं सर्वच पक्षाला महागात पडणार आहे. त्यामुळे, पुढे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची वेळ आली, तर सर्वच पक्षांनी ओबीसींच्या आधीच्या आरक्षित जागेवर उमेदवार असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसची देखील तीच भूमिका आहे. त्यामुळे जि.प. मध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी अश्याच निवडणूका होतील,’ हे त्यांनी सांगितलं.
मोठी बातमी : OBC आरक्षणाशिवायच जिल्हा परिषद निवडणूक होणार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती
तसेच, ‘आरक्षणाशिवाय निवडणुकांची चर्चा, केवळ ५ जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे. मागच्या वेळी निवडणूक आयोगाने पत्रं पाठवून कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती मागवली होती. त्यावेळी फैलावामुळे निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. आम्ही तशी विनंती केली होती. त्यामुळे यावेळीही सप्टेंबरच्या शेवटी तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता, जिल्हाधिकारी वस्तुनिष्ठ माहिती देतील. पण आरक्षणाशिवाय निवडणुका नको,’ असं मत त्यांनी मांडलं.
Read Also :
- साताऱ्यात भाजपला धक्का : आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकानी हातावर बांधले घड्याळ
- राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेसच्या आमदाराकडून छळ; पी. एन. पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल
- राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, केवळ ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार – प्रविण दरेकर
- शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचे खुले आवाहन
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना 80 ते 90 जागा लढविणार – संजय राऊत