मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा ठोकला आहे. यानंतर आता शिवसेना नक्की कोणाची, धनुष्यबान कुणाचा आणि शिवसेना भवन कोणाचं असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात आल्या आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे मुंबईमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे.
“ठाकरेंना आव्हान देण्यासाठी शिंदे दादरलाच उभारणार प्रति शिवसेना भवन”
प्रतीसेनाभवन उभारण्याची भाषा करणाऱ्या लोकांबद्दल मला अपार सहानुभूती वाटते. डूप्लीकेट डूप्लिकेटचा खेळ खेळता खेळता सत्य आणि भ्रम यातला फरक विसरून कोल्ह्यानी स्वतः वाघ असल्याचा बनाव सुरु केला आहे. असा टोला सुषमा अंधारे यांनी शिंदेंना लगावला. त्याचबरोबर अर्थात् लांडग्यांच्या कळपात गेल्यावर हे बोलणं स्वभाविक आहे. असं म्हणत त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे.
“रात्री दोन-तीन तास झोपणारा मुख्यमंत्री मिळालाय, त्याचा उपयोग महाराष्ट्राने करून घेतला पाहिजे”
एकनाथ शिंदे प्रति शिवसेना भवन उभारण्याच्या तयारीत नाहीत ना? असा प्रश्न विचारला असता आमदार सदा सरवणकर म्हणाले की, खरी शिवसेना आम्हीच आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. राज्यातून त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येतात. त्यासाठी एखाद कार्यालय हवं. त्यामुळे दादरमध्ये एखादं कार्यालय हवं असं आमचं मत आहे. कार्यालय निश्चित असेल तर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटतात. कार्यालयाचं नाव काय ठेवायचं ते नंतर ठरवलं जाईल पण दादरच्या मध्यवर्ती ठिकाणी कर्यालय असावं अशी इच्छा मुख्यमंत्री शिंदे यांची आहे, असं सदासरवणकर यांनी म्हटलं आहे.
“आता आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे, ते मला पुढे कॅबिनेट मंत्रिपद देतील”; संजय शिरसाठ
मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत हा गैरसमज पसरवला जात आहे. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता यावं यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे. शिवसेना भवन बद्दल आम्हाला कालही आदर होता आणि उद्याही राहील, असं कॅबिनेट मंत्री उद्य सामंत यांनी म्हटलं आहे.
प्रतीसेनाभवन उभारण्याची भाषा करणाऱ्या लोकांबद्दल मला अपार सहानुभूती वाटते. #डूप्लीकेट_डूप्लिकेट चा खेळ खेळताखेळता सत्य आणि भ्रम यातला फरक विसरून कोल्ह्यानी स्वतः वाघ असल्याचा बनाव सुरु केलाय.
अर्थात् लांडग्यांच्या कळपात गेल्यावर हे बोलणं स्वभाविक आहे!!!@ShivsenaComms#शिवसेना— Andhare Sushama (@andharesushama) August 13, 2022
Read also
- “शहीद होऊन अमर तरी झाला असता बाळासाहेबांसाठी नाही तर आनंद दिघेंसाठी”
- शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याचा फायदा! केंद्रात सेनेच्या ‘या’ दोन खासदारांना मिळणार मंत्रिपद
- मला काय संजय राऊत समजलं का? अन् अमित ठाकरेंनी दाखवला ठाकरी बाणा
- “शिरसाठांचे ट्विट म्हणजे त्यांच्या ‘अंतरात्म्याचा आवाज’ होता”; शिंदे गटावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- “सरकार आलं आहे, मंत्रिपद आल्यास, थांबणार नाही, झुकणार नाही, आता माझ्याकडे वेळच वेळ;