IMPIMP
Jarange Patil said, don't let the insult that the Chief Minister has spewed be insulted Jarange Patil said, don't let the insult that the Chief Minister has spewed be insulted

“मुख्यमंत्र्यांनी जो गुलाल उधळलाय, त्याचा अपमान होऊ देऊ नका,”जरांगे पाटील काय काय म्हणाले?

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला मनोज जरांगे पाटील यांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करून त्याचा नवीन जीआर काढून जरांगे पाटलांच्या हाती दिला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना गुलाल लावून विजयाचा गुलाल देखील आज वाशीत उथळला. त्यामुळे मराठा समाजाकडून यांचं जोरदार स्वागत आणि मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात आला.

जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर कूच करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या. त्यानंतर राज्य सरकारची रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. या बैठकीत जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशीत येऊन सरकारचा नवीन जीआर जरांगे पाटलांच्या हाती दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना ज्युस पाजून त्यांचं उपोषण सोडवलं.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांनी जो गुलाल उधळला आहे. त्याचा मुख्यमंत्र्यांनी अपमान होऊ देऊ नका. नवा जीआर आता कायम राहू द्या.सगेसोयरे आरक्षणात यावेत यासाठी अध्यादेश महत्वाचा होता. मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढल्याबद्दल त्यांचे आभार. साडेचार महिन्यांपासून संघर्षण सुरू आहे. आरक्षणासाठी 300 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबीर सुरू, 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या. परंतु पुढे आरक्षणातील कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी मी सर्वात पुढे राहीन. या अध्यादेशाला काही धोका झाला तर मी सगल्यात पहिले मुंबईला, आझाद मैदानावर उपोषणाला आलोच म्हणून समजा. असा इशारा देखील दिला आहे.