नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे मोठे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जितिन प्रसाद हे राहुल गांधींच्या देखील जवळचे मानले जात असे. गेल्या काही दिवसात काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातच आता जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
यावर बोलताना उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिस रावत यांनी जितिन प्रसाद भाजपमध्ये जाणे म्हणचे आमच्या तोंडावर जोरात चपराक मारल्यासारखं असल्याचे म्हटले आहे.
Jitin Prasada joining BJP is like a big slap on our face. It is sad & disheartening. I'm surprised that he called Congress a regional party & joined the party against which his family fought: Congress leader Harish Rawat pic.twitter.com/luSfbnZ9Ma
— ANI (@ANI) June 9, 2021
जितीन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश करणे हे म्हणजे आमच्या तोंडावर मारलेली चपराक आहे. हे खूपच दु:खद आणि निराश करणारं आहे. त्यांनी काँग्रेसला स्थानिक पक्ष म्हटल्याने मला आश्चर्य वाटलं. तसेच त्यांच्या कुटुंबियांनी या पक्षाविरोधात संघर्ष केला त्यामध्येच त्यांनी प्रवेश केला हे गोंधळून टाकणारं आहे, असे रावत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीमध्ये जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील यानंतर भेट घेतली.
Read Also :
- Video : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने पुण्यात साकारले 53 फूट उंचीचे भित्ती चित्र
- प्राधिकरणाचा उद्देश साध्य झालेला नाही; भाजपच्या राम-लक्ष्मणाची जोडी कोर्टात जाणार
- ‘मालाडमधील घटनेत 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेना शासित BMC कडून योजनाबद्ध हत्या’
- आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला सरकार देणार 600 कोटी
- ‘मुंबई पाण्याने भरी…मुख्यमंत्री बसले घरी’