मुंबई : अभिनेत्री कंगना रनावत आणि वादग्रस्त वक्तव्य यांचे एक वेगळे नाते आहे. कायम काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा कंगना रनोत नेहमीच प्रयत्न करत असते. यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि कंगणामध्ये नेहमीच खटके उडत असतात. आता पुन्हा एकदा शिवसेनेकडून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनावर हल्लाबोल चढवला आहे.
हिंदुंची दुकान तोडली, जाळली, त्यावर कोणी बोललं का? देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल
कंगनाने नुकतीच दोन वादग्रस्त वक्तव्ये केली आहे. “देशाला खार स्वतंत्र हे २०१४ नंतर मिळालं, त्याआधी १९४७ला मिळली ती भीक होती ” असं वक्त्यव्य कंगनाने मागील काही दिवसांपूर्वी केलं होतं. या वक्तव्यानंतर कंगनावर बऱ्याच राजकीय नेत्यांनी आणि इतर काही क्षेत्रातील लोकांनी टीका केली होती. तरीही कंगनाने आपले वक्तव्य मागे घेतले नव्हते.
नांदेडमध्ये हिंसाचाराप्रकरणी ५० जणांना अटक; रझा अकादमीच्या आयोजकांसह ४०० जणांवर गुन्हे दाखल
आता कंगनाने पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं. कंगनाने आता थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर टीका केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंह यांना त्यावेळी महात्मा गांधींकडून कोणताही पाठींबा मिळाला नव्हता. तसेच एक गालावर थप्पड मारल्यावर दुसरा गाल पुढे केल्यानंतर भीक मिळते, स्वातंत्र्य मिळत नाही असं म्हणत अहिंसेची खिल्ली उडविली आहे.
ठाकरे सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं, पडळकरांचा घणाघात
कंगनाने तिच्या इंस्टाग्रामला काही पोस्ट शेअर केल्या असून आपले नायक निवडताना विचार करा असा सल्ला देखील दिला आहे. तसंच महात्मा गांधींना संततीची भूक होती असं देखील आहे. कंगनाच्या या वक्तव्याचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनाच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं असता किशोरी पेडणेकर यांनी कंगना ही राक्षसी वृत्तीची बाई असल्याचं म्हटलं आहे. “भयानक आहे, भयानक आहे, ही राक्षसी वृत्तीची बाई आहे. एकावर एक एकावर एक नीचपणाचा कळस करते, त्यामुळे सकाळी सकाळी या बाईचं नावंही घेऊ नये,” असं म्हणत त्यांनी यावर जास्त भाष्य करणं टाळलं.
Read Also :
- शरद पवारांकडून नवाब मलिकांची पाठराखण; म्हणाले, ‘अधिकारांचा गैरवापर करणाऱ्याला…
- विमानातील प्रवाशासाठी भागवत कराड ठरले देवदूत; पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक
- काँग्रेसला मोठा धक्का: माजी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादीच्या गळाला, पवारांच्या उपस्थितीत प्रवेश
- संपकरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यातच घातला दगड
- “आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार”; राणेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल