जालना : काही दिवसांपूर्वी ईडीच्या कारवाईवरून शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर चर्चेत आले होते. रावसाहेब दानवे यांच्यामुळेच ईडीचा ससेमिरा आपल्यामागे लागल्याचा आरोप खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमांमधून केला होता. तसंच आपण जालना लोकसभा लढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या याच प्रतिक्रियेनंतर सध्या जालना शहरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भावी खासदार’चे अनेक बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात रावसाहेब दानवे अर्जुन खोतकर यांच्यातला संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो, अशा राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
मुंबै बँकेवर प्रविण दरेकरांचा झेंडा; सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय
शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील संघर्ष जुनाच आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीने छापा मारला. या छाप्यामागे रावसाहेब दानवे असल्याचा आरोप खोतकर यांनी केला होता. त्यानंतर जाहीर कार्यक्रमांमध्ये दोघांचेही परस्परांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता शहरात अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर भावी खासदार, फिक्स, खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दानवेंविरुद्ध खोतकर यांनी दंड थोपटले होते. मात्र निवडणुकीत भाजप शिवसेना युती असल्यामुळे खूप मनधरणी केल्यानंतर खोतकर यांनी माघार घेतली होती. मात्र आता ईडीच्या कारवाईनंतर दानवेंविरुद्ध ते जाहीर कार्यक्रमांतून आरोप करत आहेत. त्यामुळे आगामी 2024 च्या निवडणुकीत अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत पहायला मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यात पुन्हा लॉकडाउन? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत
खोतकर यांच्यासाठी करण्यात आलेल्या या बॅनरवर काँग्रेस नेत्यांनीही काल प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांचं नाव घेता एका कार्यक्रमात यावर खोचक टीका केली. ते म्हणाले, खासदारकीचं स्वप्न पाहणं चांगलं नसतं. पण भावी खासदार म्हणलं नाही तर कार्यकर्तेही पळून जातील, त्यामुळे असं बोलावं लागतं… अशी खोचक टीकाही गोरंट्याल यांनी केली.
Read also:
- नरेंद्र मोदी आणि अमित शहा शिवाजी महाराजांचे अवतार; भाजप आमदाराचं अजब विधान
- आशिष शेलारांच्या खात्यात मोदींनी १५ लाख टाकले वाटतं?, सचिन सावंतांचा खोचक सवाल
- म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा
- ‘एका बँकेवर विजय मिळवून राज्यात सत्ताबदलाची बोंब मारणे म्हणजे भाकडकथा’; सामनातून नारायण राणेंना चिमटे
- पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही मिनी लॉकडाऊन? मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं