मुंबई: संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारच्या मंत्र्यांच्या मागे ईडीचे हत्यार मागे घेऊन लागलेल्या सोमैयांना आणि दस्तुरखुद्द ईडीला संजय राऊत यांनी अक्षरशः धु-धु धुतले आहे. काय यांच्या बापाच्या राज्य आहे का ? तो मुलुंडचा भडवा, दलाल असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमैयांचे वाभाडे काढले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु होते. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना किरीट सोमैया यांनी उत्तर दिले होते.
हे पण वाचा, आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है ! – अमृता फडणवीस
काल मी भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये जाणार असं म्हटलो मात्र त्यांची नाव सांगितली नव्हती. एका मागून एक जेव्हा हे सगळे जेलमध्ये जातील तेव्हा तुम्ही ते मोजत जायचे असं संजय राऊत यांनी पत्रकारांना म्हटलं आहे. बाप बेटे नक्कीच जेलमध्ये जाणार असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दुसऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी किरीट सोमैया देत असतात हे ईडीच्या नावावर, पण आता यांनाच जेलमध्ये जावे लागणार हे मात्र नक्की. ईडीच्या नावावर खंडण्या गोळा करणे, लोकांना धमकावणे ही जी कामे सुरु आहेत ना त्याचा परिणाम काय असतो हे आता मी सोमैया आणि त्यांच्या साथीदारांना दाखवणार आहे. मुंबईतील कित्येक बांधकाम व्यावसायिकांना धमकावण्याचे काम यांनी केलेलं आहे.
हे पण वाचा, कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी सात दिवसात FIR दाखल करा, अन्यथा पोलिसांना कोर्टात खेचू – सोमय्या
अमोल काळे नावाच्या व्यक्तीने काय व्यवहार केले आहेत. त्याचं नाव आता मी घेत आहे आणि बघा त्यानं किती मोठे आर्थिक व्यवहार केले आहेत. हरियाणामधील एक दूधवाला महाराष्ट्रात येऊन भाजपच्या मंत्र्यांच्या संपर्कांत येऊन शेकडो कोटी रुपये कमवतो. हे काय आहे ? आणि त्यांच्या संपर्कात कोण होतं हे लवकरच कळेल असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
हे पण वाचा,
- ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ‘तारीख पे तारीख’, पण कुणाच्या भरवश्यावर; राऊत कडाडले
- महाराष्ट्र गांXची औलाद नाही, तुमच्या नामर्दानगीला घाबरणार नाही; राऊतांची तोफ धडाडली
- तो मुलूंडचा दलाल, भडवा, त्याच्या बापाच राज्य आहे का? संजय राऊतांची सोमय्यांवर फटाकेबाजी
- मोठी राजकीय उलथापालथ: राऊतांच्या पत्रकार परिषदेआधीच चंद्रकांत पाटील, सोमय्या दिल्लीकडे रवाना