मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची तब्ब्ल १०० कोटी रुपयांची मालमत्ता आयकर विभागाने (ID) जप्त केली असल्याचा दावा भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, त्यांनी आज सकाळी ७ वाजता ट्विट करत हा दावा केला आहे. मात्र दुसरीकडे हा दावा खोटा असल्याचे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांच्याकडून देण्यात आले आहे.
राणे माणसाची औलाद नाही, तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर नाव सांगणार नाही – शिवसेना आमदार
“ठाकरे सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांचा 100 कोटींचा बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे, या प्रकरणात डायरेक्टर आयकर विभागा (इन्वेस्टिगेशन) मार्फत मुंबईच्या सेशन कोर्टात दावा दाखल करून, कायदेशीर कारवाईची प्रक्रियाही सुरू केली गेली असल्याची माहिती मिळत असून, किरीट सोमय्या आणि माहिती अधिकार कार्यकरत्या अंजली दमानिया यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.
Thackeray Sarkar's Minister Chhagan Bhujbal, Ex MP Samir Bhujbal Ex MLA Pankaj Bhujbal's ₹100 crore BENAMI Properties Siezed by Income Tax
ठाकरे सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांचा ₹100 कोटींचा बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 25, 2021
“या प्रकरणासंदर्भात मंगळवारी ID ने प्रेसनोट जारी केली. त्यानुसार समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांची १०० कोटींची किंमत असलेली इमारत जप्त करण्यात आली आहे, जी बेनामी मालमत्ता आहे. ही इमारत त्यांनी कलकत्त्याच्या कंपनीद्वारे खरेदी केली होती आणि या संदर्भात सेशन कोर्टात बेनामी व्यवहाराच्या अंतर्गत फौजदारी दावा दाखल करण्यात आला असून, त्याची सुनावणी होणार आहे आणि यात त्यांना ७ वर्षापर्यंतची शिक्षा थोटवली जाऊ शकते,” असेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपचा ‘ऍक्शन मोड’, शोधलं ठाकरेंनी केलेलं ‘थोबाड फोडणारं’ वक्तव्य
दरम्यान, यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून, “१०० कोटींच्या ज्या इमारतीवर कारवाई होत आहे आणि त्याच्याशी माझं नाव जोडलं जात आहे. त्या इमारतीच्या मालकानेच हे स्पष्टीकरण दिलं आहे; की ही मालमत्ता त्यांच्या कंपनीची असून, भुजबळ कुटुंबियांचा या सगळ्याशी काहीही सबंध नाही. मात्र तरीही भाजप नेते असे मंत्र्यांवर कारवाईचे दावे का करतात कळत नाही. तुमच्या यंत्रणा स्वतंत्र आहेत, कोर्ट स्वतंत्र आहे, मग असं कसं म्हणता, याचाच अर्थ त्या यंत्रणा दबावाखाली आहेत का? असं ते म्हणाले.
Read Also :
- परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू
- दु. ४ वाजता राणेंची पत्रकार परिषद, नवे गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा
- आसमान में थुंकने वालों, करारा जवाब मिलेगा; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
- फुग्याला भोक तुमच्या पडलं, आमच्या नाही; चंद्रकांत पाटीलांचा शिवसेनेवर घणाघात
- फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी माझ्या आदेशावर ठाम; नाशिक पोलिसांकडून राणेंना नोटीस