उस्मानाबाद: जिल्हाधिकारी कार्यालय येथे जलसंपदा विभागाची राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीत कृष्णा-मराठवाडा प्रकल्पात कळंब तालुक्यातील दुधाळवाडी व रामदरा साठवण तलावाची कामे प्राधान्यक्रमाने समाविष्ट केली असल्याने या मंजूर कामांच्या निविदा काढणे व कामे तात्काळ सुरु करणेबाबत संबंधीतांना आदेश व्हावेत. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या रक्कमेत बदल (खर्चात वाढ) झाल्याने ११७२६ कोटींचा सुधारित प्रस्ताव जलसंपदा विभागास प्राप्त झाला आहे. या द्वितीय प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक असल्याने तो मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात येऊन प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. या विषयी सकारात्मक चर्चा झाली.
हे पण वाचा, मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी ठाकरे सरकारकडून २८५ कोटींच्या निधीला मंजुरी
हे पण वाचा, मराठवाड्यात भगीरथ अवतरणार, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला मंजुरी
उस्मानाबादजिल्ह्याचा समावेश निती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा योजनेत असून दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रुपांतर करण्याच्या व तलाव दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात यावी. तसेच कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचे जिल्ह्याला ७ टी एम सी.पाणी देण्यात यावे अशी मंत्री महोदयांना विनंती केली.
हे पण वाचा, जायकवाडी ३३ टक्के पाणी साठा शिल्लक; रोज होतोय ४५० गावांना चार दिवस पुरेल इतक्या पाण्याचे बाष्पीभवन
हे पण वाचा, जायकवाडी कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६५० कोटीचा आराखडा तयार करणार – जयंत पाटील
मा.मंत्री महोदय याबाबतीत अतिशय सकारात्मक असून जून २०२३ पर्यंत जिल्ह्याला ७ टी एम सी.पाणी देण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कामे पुर्ण करण्याच्या सुचना केल्या. तसेच जिल्ह्यातील मंजूर कामे करण्यासंदर्भात येत्या ८ (आठ) दिवसांत निविदा काढण्याचे आश्वासन दिले.
हे पण वाचा, औरंगाबादचं प्रत्येक घर बदलवणारी ‘पाणी पुरवठा योजना’ कशी आहे? जाणून घ्या…
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, आ.ज्ञानराज चौगुले, आ.सुरेश धस, आ.विक्रम काळे, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, कृष्णा-मराठवाडा बांधकाम विभाग क्र.०१ चे कार्यकारी अभियंता श्री.कृ.ए.घुगे, कार्यकारी संचालक श्री.के.बि. कुलकर्णी, मुख्य अभियंता श्री.दिलीप तवार, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, अधिक्षक अभियंता श्री. अभिजित म्हेत्रे, भारत शिंगाडे, जि.प.मुख्य अधिकारी डॉ.विजयकुमार फड आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हे पण वाचा,
विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्ष पदासाठी आमदार प्रणिती शिंदेंसाठी मुंबईत जोरदार लॉबिंग
अजितदादा आणि बाळासाहेब थोरात अगस्ती साखर कारखाना चालविण्यास घेणार, असे मी म्हटलोच नाही
नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं? आंदोलकांचा आज सिडकोला घेराव
बुलढाण्यातील राजकीय समीकरणे लवकरच बदलणार? प्रसेनजीत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश