कराड: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजता प्रारंभ झालेला आहे. सातारा, सांगली जिल्हांसह पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखाना ताब्यात राहण्यासाठी महिनाभरापासून कृष्णाकाठावर रणधुमाळी सुरु होती. महिन्याभराच्या रणधुमाळीनंतर तिन्ही पॅनलमधील दिग्ग्ज नेत्यांचे भवितव्य आज मतदानातून ठरणार आहे. मतदारांचा कौल नेमका कुणाला जाणार हे तीन जुलै रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, विरोधकांनी गेल्या ६ वर्षात सभागृहात तोंड का उघडले नाही? डॉ. सुरेश भोसले यांचे टीकास्त्र
यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन व जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले यांनी रेठरे बुद्रुक विकास सेवा सोसायटी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला. तसेच ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी आपल्या कुटुंबीयांसह रेठरे बुद्रुक मराठी शाळेतील केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना जयवंतराव भोसले सहकार पॅनल निश्चित विजयी होईल असा विश्वास डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला आहे. आम्ही सत्तेत असताना ३७ कोटी रुपयांची साखर सभासदांना मोफत वाटली होती. तसेच सभासदांच्या उसाला राज्यात विक्रमी असा सरासरी ३००० रुपये इतका भाव दिला होता. प्रचारासाठी दोन्ही जिल्ह्यांमध्ये दौरे करत असताना सभासद आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह होता. जवळपास सर्वच गावांत आम्हाला आशादायक विश्वास मिळाल्याने आम्ही नक्कीच कारखान्याच्या निवडणुकीत विजयी होणार असे देखील डॉ. सुरेश भोसले यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा