कराड: उंडाळे भागातील शेतकरी सभासदांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले. शेतकरी सभासदांच्या मागणीनुसार कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून वाकुर्डे योजनेची थकीत वीजबिलाची एकूण १५ लाख ८० हजार रुपये इतकी रक्कम भरण्यात आली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. येत्या काळातही या भागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार पॅनेलच्यावतीने विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने उंडाळे विभागातील सभासद मेळाव्यात ते बोलत होते.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, “अविनाश मोहिते ९५ दिवस तुरुंगात का गेले होते हे एकदा त्यांनी जनतेला सांगावे” मदनराव मोहितेंची टीका
व्यासपीठावर सहकार पॅनेलचे उमेदवार दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, संचालक पांडुरंग होनमाने, माजी संचालक श्रीरंग देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुरेश भोसले पुढे म्हणाले, गेल्या सहा वर्षात आम्ही शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला आहे. सरासरी हा दर ३००० रुपये इतका आहे. आम्ही पारदर्शक व नियोजनबद्ध असा कारभार केला. कृष्णा कारखाना एक कुटुंब आहे, या विचाराने काम आम्ही केले. येत्या काळातही कृष्णा कारखाना शेतकरी सभासद हिताचे अनेक उपक्रम राबविणार आहे. तसेच कारखान्याची गाळप क्षमता ९००० मे. टनावरून १२,००० मेट्रिक टन वाढविण्याचा आमचा मानस आहे. जयवंत आदर्श योजना अधिकाधिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे.
हे पण वाचा, महाडिक गटाचा सहकार पॅनेलला जाहीर पाठिंबा; डॉ.सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाडिक बंधूंची घोषणा
हे पण वाचा, सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना देशात एकमेवच; डॉ. सुरेश भोसले यांचे प्रतिपादन
यावेळी सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर करताना पंजाबराव पाटील म्हणाले, की डॉ. सुरेशबाबांनी आपल्या अथक प्रयत्नातून कृष्णा कारखाना चांगल्या पद्धतीने चालविला आहे. ऊसाला चांगला दर देऊन शेतकऱ्यांचे हित साधले असून, सभासदांनी सहकार पॅनेलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे.
मारूती शेवाळे यांनी प्रास्तविक केले. संजय शेवाळे यांनी आभार मानले. यावेळी जिंतीचे सरपंच जयवंत शेवाळे, महारूगडेवाडीचे उपसरपंच अजित महारूंगडे, घोगावचे उपसरपंच निवास शेवाळे, मनवचे उपसरपंच दादासो शेवाळे, डॉ. सुरेश पाटील, पंकज पाटील, सतीश पाटील, अशोक पाटील, आण्णासो शेवाळे, रामचंद्र भावके, पैलवान सचिन बागट, काशीनाथ पाटील, डी. एस. पाटील, हणमंतराव थोरात, सर्जेराव थोरात यांच्यासह सभासद उपस्थित होते. Krushna Sahakari Sakhar Karkhana Dr. suresh bhosale Speach Sahakar panel
हे पण वाचा,
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा
“कारखाना डबघाईला आणणारे विरोधक सभासदांचे काय भले करणार?’’ सुरेश भोसलेंनी घेतला विरोधकांचा समाचार