इस्लामपूर: गेल्या ६ वर्षांपूर्वी आम्ही प्रतिकूल परिस्थितीत कृष्णा कारखान्यात सत्तेवर आलो. पण सर्व संकटावर मात करत आज आम्ही कृष्णा कारखाना मजबूत स्थितीत आणला. याउलट पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी मात्र कारखाना डबघाईस आणला होता. असे विरोधक पुन्हा सत्तेवर येऊन सभासदांचे काय भले करणार, अशा शब्दांत कृष्णा कारखान्याचे चेअरमन आणि सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांनी विरोधकांचा समाचार घेतला. इस्लामपूर (ता. वाळवा) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटातील उमेदवार संजय पाटील, जितेंद्र पाटील, जे. डी. मोरे, अविनाश खरात, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भगवान पाटील, आनंदराव पाटील, सुनील पाटील, केदार पाटील, युवराज जाधव, शहाजी पाटील, संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा
डॉ. भोसले म्हणाले, की आमचा व इस्लामपूरचा संबंध पूर्वीपासून आहे. इथले लोक नेहमीच चांगल्या विचारांच्या पाठीशी राहिले आहेत. विरोधक निवडणूक आली की कृष्णा हॉस्पिटलचा मुद्दा प्रचारात घेतात. पण कृष्णा हॉस्पिटल ही आरोग्यसेवा देणारी पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची संस्था आहे. कोरोना काळात कृष्णा हॉस्पिटलने भरीव कामगिरी केली आहे. पण विरोधक असणारे आमचे डॉक्टर बंधू यांनी एका तरी कोरोना रुग्णावर उपचार केले का? चांगल्या चाललेल्या संस्थांवर टीका करण्याशिवाय त्यांना दुसरा उद्योग नाही. तर दुसऱ्या विरोधकांच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराची माहिती सर्व सभासदांना आहेच. आता सत्तेत कधी जातोय, याची त्यांना स्वप्ने पडू लागली आहेत.
हे पण वाचा,“मोफत साखरेचे अभिवचन पूर्ण करण्याचे काम सहकार पॅनलने गेल्या सहा वर्षांमध्ये केलेले आहे”
हे पण वाचा, सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना देशात एकमेवच; डॉ. सुरेश भोसले यांचे प्रतिपादन
येत्या काळात कृष्णा कारखान्याचा विस्तार करण्याचा आमचा मानस असून, उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करत आहोत. कृष्णा कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार पॅनेलला साथ द्यावी, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
हे पण वाचा, महिला राखीव गट: ‘त्या’ नऊ इच्छुक महिला उमेदवारांमुळे पॅनलप्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ
यावेळी संपत खांबे, शशिकांत पाटील, युवराज जाधव, विश्वासराव पाटील, जयराज पाटील, विजय खांबे, सुनीता संकपाळ, संगीता कांबळे, नारायण पाटील, एम. जी. पाटील, महेश पाटील, अर्जुन जाधव, संतोष जाधव, माणिक मोरे, रजनीकांत मोरे, बाळासाहेब पाटील, श्री. शैलेश पाटील, प्रकाश पाटील, चंद्रकांत देसाई आदींसह सभासद उपस्थित होते.
हे पण वाचा:
“विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताच मुद्दा नसल्याने विरोधक गोंधळात” अतुल भोसले
पॅनेल प्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ: भोसले गट आणि जयंत पाटील गट यांची जवळीक आणखी वाढते की काय?
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत; आपण त्यांना पाहिलतं का?