कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता निवडणूक होणार आणि यावेळी देखील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात परिवर्तनाची लाट येणार की पुन्हा एकदा सहकार पॅनलचा कारखान्यावर दबदबा राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
हे पण वाचा, “कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता एकतर्फी होणार”, डॉ. अतुल भोसलेंची वाळव्यात गर्जना
गेल्या सहा वर्षांपूर्वी आम्ही प्रतिकूल परिस्थितीत कृष्णा कारखान्यात सत्तेवर आलो आणि कारखान्याचा कर्जाचा बोजा कमी केला. आलेल्या सर्व संकटांवर मात करत आम्ही कृष्णा सहकारी साखर कारखाना मजबूत स्थितीत आणला. याउलट २०१० साली सत्तेत आलेल्या सत्ताधिकाऱ्यांनी मात्र कारखाना डबघाईस आणला होता. असे माजी सत्ताधारी पुन्हा सत्तेत आले तरी ते सभासदांचे भले करू शकत नाही आणि तेव्हडी त्यांच्यात धमक देखील नाही अशा शब्दांत कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि सहकार पॅनलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
हे पण वाचा, निवडणुकीत पत्ता कट केलेल्या भाजपच्या मेधा कुलकर्णींचे अखेर राजकीय पुनर्वसन
प्रत्येक वेळी निवडणूक आल्यानंतर विरोधक कृष्णा हॉस्पिटलचा मुद्दा समोर घेतात आणि भाषणबाजी करतात. कृष्णा हॉस्पिटलच्या कारभारावर बोलण्याआधी त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की कृष्णा हॉस्पिटल ही आरोग्यसेवा देणारी पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची संस्था आहे. कित्येक गोरगरीब लोकांचे याठिकाणी अल्प दरात उपचार झालेले आहेत. कोरोना काळात कृष्णा हॉस्पिटलने भरीव कामगिरी केली मात्र आमचे विरोधक असणाऱ्या डॉ. बंधूनी एका तरी कोरोना रुग्णावर उपचार केले का हे त्यांनीच स्पष्ट करावे. चांगल्या चालेल्या संस्थांवर टीका करण्याशिवाय त्यांना दुसरा उद्योग नाही आणि दुसरे घोटाळेबाज आहेत त्यामुळे बोलत नाही अशी जहरी टीका दोन्ही मोहितेंवर केली आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारानिमित्त डॉ. सुरेश भोसले बोलत होता.
Read Also :
- आमदार आशुतोष काळेंच्या राजकीय ‘वजनामुळे’ गोदावरी कालव्यांसाठी तब्ब्ल ४४ कोटींचा निधी
- हे जेनतेच्या हिताच सरकार आहे की तमाशा आहे? – देवेंद्र फडणवीस
- “राष्ट्रमंच’ हा केवळ बातमीत राहण्यापुरता केलेला केविलवाणा आणि नवा हास्यास्पद प्रयोग”
- अहमदनगर महापालिका महापौर निवडणुकीत शिवसेना ‘गॅसवर’ तर काँग्रेस ‘फ्रंटफूटवर’
- अहमदनगरच्या महापौर पदासाठी शिवसेना खासदार सुजय विखेंच्या दारी