सांगली : सांगली आणि सातारा जिल्ह्यासह पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आली आहे. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गट, डॉ. इंद्रजित मोहिते गट आणि अविनाश मोहिते गट यांच्यात कृष्णा कारखान्यासाठी मुख्य लढत होणार आहे. दोन्ही मोहितेंआणि सत्ताधारी भोसले या तीनही पॅनलकडून प्रचार जोरदार सुरु आहे . दोन्ही मोहितेंचे मनोमिलन फिस्कटल्याने आता कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
वाळव्यातील भवानीनगर येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आलेले आहे. मागील संचालक मंडळाच्या काळात कृष्णा सहकारी साखर कारखान्याची विश्वासाहर्ता कमी झाली होती मात्र डॉ. सुरेश भोसले यांनी सत्तेत आल्यानंतर संचालक मंडळाकडून योग्यपद्धतीने कारभार चालवत गमावलेली विश्वासाहर्ता पूर्व पदावर आणली. सभासदांच्या उसाला गेल्या ६ वर्षांमध्ये विक्रमी भाव दिल्याने सभासद आता पुन्हा एकदा सहकार पॅनलवरच आपला विश्वास दाखवतील असा विश्वास डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा, कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील २१ जागांसाठी तब्ब्ल ३०५ अर्ज दाखल
मागील संचालक मंडळाने काय दिवे लावलेले आहेत हे मला सभासदांना सांगण्याची गरज आता राहिलेली नाही. कृष्णेचा सभासद सगळं जाणतो आहे. निवडणूक म्हटल्यावर टीकाटिप्पणी आलीच. मात्र विरोधकांनी कोणतेही चांगले काम न केल्याने त्यांना काहीही प्रचारसभेत सांगता येणार नाही अथवा सभासदांना पटवून देता येणार नाही. उच्चांकी दर, आधुनिकीकरण, गाळप क्षमता, सभासदांची विश्वासाहर्ता जपल्याने यावेळी सभासद नक्कीच पुन्हा एकदा सहकार पॅनलवर विश्वास दाखवणार हे आता मला दिसत आहे. कृष्णा सहकारी कारखाना राज्यात पहिल्या पाच क्रमांकामधे आहे आणि येणाऱ्या काळात देखील तो एक नंबरला राहील यासाठी आम्ही जीवाची बाजी लावू. विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने निवडणूक एकतर्फी बनली आहे असे देखील डॉ. अतुल भोसले म्हटले आहेत.
Read Also :
- राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; संजय राऊत म्हणतात…
- संघ भाजपच्या बैठका; योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात भाजप आमदाराची नाराजी
- बाळासाहेबांच्या बोटाला धरून भाजपा राज्यात वाढला त्याचा शिवसेनेला त्रास !
- “आमदार सरनाईक आणि त्यांचा लेटरबॉम्ब हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न”- देवेंद्र फडणवीस
- बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर हे चव्हाट्यावर आले – शिवसेना