मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळाचं ते एक्स्टेंशन आहे. त्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार आहे,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवी मुंबईचे विमानतळ हे मुंबईतील विमानतळाचं एक्सटेन्शन असल्याचा राज ठाकरे यांचा केवळ तर्क आहे. हे विमानतळ खरं तर नवीन असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे.
हे पण वाचा, “नवी मुंबई विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हेच नाव पाहिजे”- राज ठाकरे
राज ठाकरे यांचा हा केवळ तर्क आहे. नवी मुंबईचं विमानतळ खरं तर नवीन आहे. हे मुंबई विमानतळाचं एक्सटेन्शन असल्याचा मतितार्थ त्यांनी काढला, असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं असा जीआर निघाला आहे. बाळासाहेबांबद्दल त्यांना किती आदर आहे हे समोर आलं. हे खेदजनक असून, वाईट वाटत असल्याचं सावंत यावेळी म्हणाले.
हे पण वाचा, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार हे कोणाला ठाऊक, देवाला ठाऊक
दि. बा. पाटील यांनी चांगलं काम केलं यात वादच नाही. जातीचं आणि समाजाचं राजकारण काही लोक करत आहेत. दि. बा. पाटील यांचं नाव वेगळ्या प्रकल्पासाठी देऊ. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाची उंची संपूर्ण राज्यानं पाहिली आहे. बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करु नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकारण बाजूला ठेऊन सगळ्या पक्षांना आवाहन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत म्हणूनच नाव देत आहोत. जे जर आज असते तर प्रश्नच नसता, असंही अरविंद सावंत यांनी म्हटलंय. बाळासाहेबांच्या नावे स्मारक उभं राहत आहे, त्याचा अभिमान बाळगा, असं आवाहनही त्यांनी केलंय.
Read Also :
- “स्वबळाची भाषा करण्याआधी एकदा पायाखालची जमीन तपासून घ्या”- संजय राऊत
- “ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा”
- “प्रताप सरनाईकांबद्दल आम्हाला सहानुभूती, त्यांच्या पत्रातून त्यांचा छळ होत आहे.”
- “राष्ट्रवादी व काँग्रेसने, मोठ्या मनाने शिवसेनेला सांभाळून घेतलंय, त्यांच्या हे लक्षात असावं”
- युती होऊ शकते, मात्र आता निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे- गिरीश बापट