पुणे : चिंचवड विधानसभा मतदार संघात मुलभूत सोयी सुविधा देण्यासाठी आताचं सरकार कटिबद्ध आहे. मेट्रो, पुल, रिंग रोड, वाहतुक कोंडी, असे अनेक प्रकल्प देण्याचं काम आमचं सरकार करणार आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचं अपुर्ण राहिलेलं काम पुर्ण करण्यासाठी अश्विनी जगताप यांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत. अन् त्यांची स्वप्ने पुर्ण करणारं ही त्यांना श्रद्धाजंली ठरणार आहे. तसेच एक लाखांचं मताधिक्य तुम्ही देणार का ? असा उपस्थितांना सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या मतदार संघात एकही काम शिल्लक राहणार नाही, अस आश्वासन त्यांनी चिंचवडच्या सभेत दिलं.
हेही वाचा.“काॅंग्रेसला कसब्यात आणलं तर तुमचाच फायदा होणार”, प्रणिती शिंदेंची धंगेकरांसाठी सभा
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर रात्री रहाटणी येथे सभा संपन्न् झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण जगताप यांचं भरभरून कौतुक केलं. मला मुख्यमंत्री बनवण्यात लक्ष्मण जगताप यांचं मोठं योगदान होतं. मी बोलतो ते करतो, दिलेला शब्द पाळतो, त्यामुळेच या राज्यात इतिहास घडला आहे. शेवटी लोकांना भेटतो. त्यांच्या गोष्टी ऐकून घेतो, त्यामुळेच लोकांचं प्रेम मला मिळत आहे. तेच प्रेम आता या पोटनिवडणुकीत दाखवा. असं आव्हानही शिंदेंनी मतदारांना केलं.
हेही वाचा..“उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याला उद्धवस्त केलं जात असेल तर मी स्वस्थ बसणार नाही” शरद पवार
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी काढलेल्या रोड शोला महायुतीतील अनेक नेते यावेळी उपस्थितीत होते. भाजप, शिवसेना, आरपीआय,(ए) रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. त्याचबरोबर आरोग्यमंत्री, तानाजी सावंत. मावळलोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेश लांडगे, विधान परिषद आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, निवडणुक प्रमुख चिंचवड विधानसभा शंकर जगताप आदी उपस्थित होते.
हेही वाचा…“शिट्टी ला बॅट ने उत्तर,” चिंचवडमध्ये अपक्षांनी अपक्षाला धो धो धुतलं
दरम्यान, येत्या २६ फेब्रवारी रोजी या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. त्याआधी राजकीय नेत्यांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही रात्री साडे आठ वाजता अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी पिंपळे सौदागर येथे जाहीर सभा होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याही सभा होत आहेत.
Read also
- हेही वाचा.““शनिवार वाडा, सार्वजनिक गणेशोत्सव, पार्किंग व्यवस्था,” हेमंत रासनेंनी जाहीर केला आपला जाहीरनामा
- हेही वाचा..“पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो तरुणांचा सहभाग, ठिकठिकाणी जंगी स्वागत
- हेही वाचा…“राजकीय पक्ष म्हणजे आई, विधिमंडळ पक्ष म्हणजे बाळ,” ठाकरे गटाच्या वकिलांनी असं का म्हटलं?
- हेही वाचा..“शरद पवार असेपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होऊ शकत नाही”
- हेही वाचा..निवडणुक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती नाही, परंतु ‘या’ घटनेत ठाकरेंना मोठा दिलासा