मुंबई : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हांबाबत निवडणुक आयोगाच्या निकालावर ठाकरे गटाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. यावेळी संपुर्ण सुनावणी होईपर्यंत निवडणुक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी केली. मात्र निवडणुक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देता येणार नसल्याचं म्हणत न्यायालयाने ठाकरे गटाच्या वकिलांची मागणी फेटाळली. मात्र या सुनावणी एका घटनेत ठाकरे गटाच्या आमदारांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा.“नेता नाही तर बेटा म्हणून काम करण्याची इच्छा”, अपक्ष उमेदवार सिद्धिक शेख
निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर आता शिंदे गट विधीमंडळात ठाकरे गटाच्या आमदारांवर व्हीप काढणार, अन् ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार. तसेच पक्षाचा निधी आणि कार्यालयावरही शिंदे दावा करू शकतात. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. त्यावर शिवसेना व्हिप काढणार नाही, आमदारांना अपात्र करणार नाही असं न्यायालयाने ठाकरे गटाच्या वकिलांना सांगितलं. त्यामुळे याचा मोठा दिलासा ठाकरेंना मिळाला आहे.
हेही वाचा..सोसायटीधारकांसाठी भाजपाचे ‘रेड कार्पेट’ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘मायक्रो कॅम्पेनिंग’
याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या अपीलावर शिवसेना आणि निवडणुक आयोगाला सुप्रीम कोर्टाने नोटीस देत दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तुर्तास निवडणुक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देणार नाही व एक आठवड्यानंतर या मुद्यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या अपीलावर सुप्रीम कोर्टाची शिवसेनेला आणि निवडणुक आयोगाला नोटीस देण्यात आली आहे.
Read also
- हेही वाचा.“काॅंग्रेसला कसब्यात आणलं तर तुमचाच फायदा होणार”, प्रणिती शिंदेंची धंगेकरांसाठी सभा
- हेही वाचा..“उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याला उद्धवस्त केलं जात असेल तर मी स्वस्थ बसणार नाही” शरद पवार
- हेही वाचा…“शिट्टी ला बॅट ने उत्तर,” चिंचवडमध्ये अपक्षांनी अपक्षाला धो धो धुतलं
- हेही वाचा..विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला
- हेही वाचा..“सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची ‘सर्वोच्च’ सुनावणी”,ठाकरेंच्या वकिलांनी शिंदेंना अडचणीत पकडले