धाराशिव : जय श्री राम बोलल्यावर आपल्या अंगावर जो शहारा येतो, तो आपल्या आस्मितेचा, आपल्या धर्माचा विषय आहे. हा विरोधातील माजी खासदार आपल्या देवाची टिंगल करतो. पण मी त्याला सांगू इच्छितो की, माझ्या देवधर्मा बद्दल काही बोलायचं नाही. तुला जी काही हुजरेगिरी करायची आहे. ती त्या राहुल गांधी समोर कर, असा घणाघात मल्हार पाटलांनी धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केला आहे. काही दिवसापुर्वी निंबाळकर यांनी श्रीराम मंदिराबाबत भाष्य केलं होतं. त्यावर आता मल्हार पाटलांकडून निंबाळकरांना पलटवार केला जात आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्राच्या ३ मुख्यमंत्र्यांच्या विकास कामांवर पाणी टाकण्याचं काम मोदींनी केलं”
धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांचा मुलगा मल्हार पाटील मैदानात उतरला आहेत. मल्हार पाटलांची होरटी गावात जाहीर प्रचार सभा पार पडली. त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. पुढे बोलतांना मल्हार पाटील म्हणाले की, होरटी गाव हा देव धर्म मानणारा गाव आहे. पण उबाठा गटाचे नेते म्हणताहेत की, ‘जय श्रीराम’ म्हणून लागते का नोकरी? अरे भगवान श्री राम आमच्या हृदयात आहेत. तू कोणाला जॅक देऊन, टॉमी देऊन नोकरी लागली का ? असा संतप्त सवालही त्यांनी केला.
ज्या कारासेवकांनी, रामभक्तांनी, राममंदिरासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना आठवून तुमच्या डोळ्यात जे अश्रु आले ते मतदान करताना विसरू नका. असं भावनिक आवाहन देखील त्यांनी यावेळी मतदारांना केले. तसेच पूर्वी काँग्रेसवाले आमची टिंगल टवाळी करायचे. हे कसले रामाचं मंदिर बांधणार असे म्हणायचे. पण आमच्या वाघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भव्य राम मंदिर बांधून दाखवलं. असेही ते म्हणाले.
दरम्यान, 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे निवडून आले. अन् आता म्हणतात नरेंद्र मोदी म्हणजे कोण? असा सवाल करत त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार घणाघात चढवला.
READ ALSO :
हेही वाचा…” ‘गद्दार बघाओ, काँग्रेस बचाओ’चा नारा,”पुण्यात कॉंग्रेस पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
हेही वाचा….‘तू सर्वात बेस्ट सून आहेस,’ नानासाहेब नवलेंचे सुनेत्रा पवार यांना प्रशस्तीपत्रक
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपला उखडलं, कॉंग्रेसने जाहीर केली मोठी आकडेवारी
हेही वाचा…मुरलीधर मोहोळ २५ एप्रिलला भरणार उमेदवार अर्ज, तर २९ तारखेला मोदींचा रोड शो अन् जाहीर सभा