मुंबई : कन्हैय्या कुमार आणि हार्दिक पटेल यांना जेव्हा मांडीवर घेऊन बसला होता तेव्हा त्याला बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच बाळकडू दिल होत काय? त्यामुळे तुमच्या दोन ढोंगीपणाला महाराष्ट्राची जनता विटली आहे, पण तुमचा ढोंगीपणा संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलाय, मराठी मराठी करताय, निदान या दिवाळीला तरी मराठी कामगार असलेल्या एसटी कामगारांचं पगार करा, अशी मागणी करत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
काल रायगड पोलिसांनी रिपब्लिकचे एडिटर अर्णब गोस्वामी यांची राहत्या घरातून अटक केली होती, त्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती.
त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अलिबाग न्यायायलात सुनावणीसाठी हजार केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.सरकारच्या या कारवाईमुळे अनेक भाजप नेते, कारकर्त्यांनी काल राज्यभरात आंदोलन केले होते, अमित शाह, स्मुती इराणी यांनी सुद्धा अर्नबवरील कारवाईचे निषेध केला आहे.
Read Also :
“भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागलीय” ; शिवसेनेचा हल्लाबोल
“अर्णब हा भाजपचा प्रवक्ता आहे. म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर”
नोव्हेंबरच्या अखेर पर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल ; विजय वट्टेडीवार
काँग्रेस नेते आशिष देशमुख अमरावतीतून विधान परिषदेवर जाणार ?