औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांचा गौरव समारंभ पार पाडला. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळेंसह मराठवाड्यातील अनेक मोठे नेते उपस्थित असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे थेट सुळेंकडे मंत्रिपदाचीच मागणी केली.
मला आणि चव्हाण यांना मंत्रीपद द्या. हवं तर अडीच-अडीच वर्षं द्या. त्यासाठी तुमचा फॉर्म्युला वापरा, अशी मागणी काळे यांनी करताच सभागृहात हशा उसळला.
दोघांना मंत्रिपद द्यायचं असेल तर अडीच वर्षे सतीश चव्हाण यांना आणि अडिच वर्ष मला संधी द्यावी सतीश चव्हाण किंवा मला मंत्रिपद देण्यात यावे. जर दोघांना मंत्रिपद देण्यात अडचण असेल तर सीनिअर म्हणून सतीश चव्हाणांना संधी देण्याची मागणी विक्रम काळे यांनी केली.
तुमचे म्हणणे अजितदादा आणि साहेबांपर्यंत पोहचवते, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील काळेंच्या मागणीला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, आमदार विक्रम काळे, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, अंकुशराव कदम, कैलास पाटील, औरंगाबादचे महापौर नंदू घोडेले, आयोजक राजेश करपे उपस्थित होते.
Read Also :
- ‘भाजपवाले खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंगकरून वर आले’
- धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करा, आता या नेत्याने केली मागणी
- ग्रामपंचायत निवडणूक : विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास मनाई
- शिवसेना आता ‘या’ राज्यातील विधानसभा निवडणूक लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
- ‘निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे’, अजित पवारांचे टीकास्त्र