मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची व राजीनाम्याची मागणी करत आहे. मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेवरच इतरांनी आरोप केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
दरम्यान, आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी याप्रकरणावर भाष्य करत, मुंडेंवरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाबाबत जास्त माहिती नाही, मात्र याची चौकशी करावी, असे आझमी यंनी म्हटले आहे.
लिव्हींग रिलेशनमध्ये एखादी मुलगी जर राहत असेल तर काहीही होऊ शकते. पण काही दिवसांनतर जर ती मुलगी ब्लॅकमेल करायला लागेल. तर काय होईल ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दुसऱ्या बाजूला कोणीही तुम्हाला मुर्ख बनवत चुकीचे काम केले. या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे याची योग्य ती चौकशी व्हावी. पण लिव्हिंग रिलेशनमध्ये राहताना अनेक अडचणी येत आहे. त्याबाबत काही तरी करणेचे आहे, असे आझमी म्हणाले.
Read Also :
- ग्रामपंचायत निवडणूक : विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास मनाई
- शिवसेना आता ‘या’ राज्यातील विधानसभा निवडणूक लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
- ‘निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे’, अजित पवारांचे टीकास्त्र
- ‘कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा ना संत्री’, गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य
- ईडीच्या निशाण्यावर आणखी एक शिवसेना नेता ? किरीट सोमय्यांची चौकशीची मागणी