पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. तीन दिवसाच्या या दौऱ्यामध्ये राज ठाकरे पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, राज्य उपाध्यक्ष, राज्य सचिव यांच्यासोबतच प्रभाग अध्यक्ष, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याही बैठका घेणार आहेत. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
अंतर्गत राजकारणामुळेच संजय धोत्रेंचा राजकीय बळी; राजकीय चर्चेला उधान
मनसे पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांमध्ये काय चर्चा होणार, त्यावर निवडणुकीच्या अनुषंगाने, पक्ष संघटना बांधणीसाठी काय आराखडे तयार केले जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मनसेचे नेते, राज्य उपाध्यक्ष आणि सरचिटणीस यांची बैठक आज झाल्यानंतर उद्या विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि त्यानंतर प्रभाग अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या बैठका राज ठाकरे घेणार आहेत.
‘अनिल बाबू आगे बढो हम तुम्हारे साथ है’; देशमुखांच्या समर्थकांकडून ईडी कारवाईचा निषेध
मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सोडून आदित्य शिरोडकर यांनी गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून मनविसेला सावरण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर असेल.
मोठी बातमी: फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा
दरम्यान, नाशिक दौरा आटपून राज ठाकरे सोमवारपासून पुणे दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत राज ठाकरे यांची झालेली १५ मिनिटांची चर्चा सर्वत्र उत्सुकतेचा विषय ठरली होती. राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत, मीही नाशिकमध्येच आहे. आमच्या वेळा जुळल्या तर राज यांच्यासोबत एक कप चहा घ्यायला काहीच हरकत नाही, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं, त्यानंतर लगेचच या दोन्ही नेत्यांच्या वेळाही जुळल्याचं दिसलं.
Read Also :
- पावसाळी अधिवेशन: ‘दलित, महिलांनी मंत्री झालेलं विरोधकांना बघवत नाही’
- मुख्यमंत्री आज पंढरपूरकडे रवाना होणार, २० जुलै रोजी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार
- …तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा; पृथ्वीराज चव्हाण यांचा सल्ला
- मुंबईत पावसाने घेतलेल्या बळींना जबाबदार कोण? महापालिका की नागरिक?
- अंतर्गत राजकारणामुळेच संजय धोत्रेंचा राजकीय बळी; राजकीय चर्चेला उधान