नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात मोदी सरकार कोण कोणती विधेयकं मंजूर करून घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच विरोधकही करोना व्यवस्थापन, इंधन दरवाढ आणि कृषी विधेयकांच्या मुद्यांवर आक्रमक असतील. तत्पूर्वी, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, यावेळी जोरदार पाऊस सुरू असतानाही ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी स्वतःची छत्री स्वतःच पकडलेली होती. काही मंत्रीही यावेळी मोदींसोबत उभे होते. मोदींचे यावेळचे फोटो सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत आणि यावर लोकांमध्ये जबरदस्त चर्चाही सुरू आहे.
पावसाळी अधिवेशन: ‘दलित, महिलांनी मंत्री झालेलं विरोधकांना बघवत नाही’
या फोटो संदर्भात, भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करत लिहिले आहे, साधे जीवन आणि उच्च विचार प्रकट करताना देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी. हा फोटो आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वीचा आहे. जेव्हा ते पत्रकारांसोबत बोलत होते.
'सादा जीवन उच्च विचार' के सिद्धांत को चरितार्थ करते देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी।
ये तस्वीर आज से शुरू हो रहे मानसून सत्र के पहले की है जब वे पत्रकारों से चर्चा कर रहे थे। pic.twitter.com/VMECqlgVDt
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) July 19, 2021
पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले मोदी
कोरोनाच्या महासाथीचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येत आहे. संसदेत या महासाथीच्या संबंधात चर्चा केली जावी. खासदारांकडून सर्व सूचनाही मिळाव्यात, जेणेकरून या महासाथीचा सामना करण्यासाठी आपल्या लढाईला अधिक बळकट करता येईल आणि कमतरताही दूर केल्या जातील, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
मानसून सत्र से पहले पीएम मोदी मीडिया से बात करते हुए। विश्व के सबसे बड़े लोकतंत्र के प्रधानमंत्री का बारिश के दौरान स्वयं छाता पकड़कर खड़े होना सरल व्यक्तित्व को प्रदर्शित करता है। #NarendraModi pic.twitter.com/ihykpLtO6J
— Digvijay Singh 🇮🇳 (@Digvijaybjp27) July 19, 2021
एका युझरने पंतप्रधान मोदींचा यावेळचा फोटो शेअर करत ‘मन जिंकले मोदी जी’ असे लिहिले आहे.
दिल जीत लिया मोदी जी ❤️ pic.twitter.com/2SWtNEKHzs
— Varun Rastogi 🇮🇳 (@Thevarunrastogi) July 19, 2021
Read Also :
- का होतोय केंद्रावर नागरिकांची हेरगिरीचा केल्याचा आरोप? काय आहे नेमकं ‘पेगासेस’ प्रकरण; वाचा थोडक्यात
- “पंतप्रधान-गृहमंत्र्यांना दिलेली सुरक्षा अनावश्यक” म्हणणाऱ्या राऊतांची, चित्रा वाघ यांनी उडवली खिल्ली
- फडणवीसांनी खुलासा, भाजप हा नक्की ‘कुणाचा’ पक्ष? देशात मोदींच्या नेतृत्वाखाली ‘कुणाचे’ राज्य आहे?
- पावसाळी अधिवेशन: ‘दलित, महिलांनी मंत्री झालेलं विरोधकांना बघवत नाही’
- भाजप नेत्यांची तोंडे बंद करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असा गनिमी कावा