मुंबई : आगामी 2024 ची लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या केंद्रीय मंत्रिमंडळातून 11 मंत्र्यांना डच्चू मिळणार असून यात शिंदे गटातील खासदारांची लॉटरी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौरा केला होता. त्यावेळीच चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात बदल केले जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात येईल, अशी चर्चा अलिकडेच भाजपच्या झालेल्या राष्ट्रीय कार्यकारीणी सभेत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या 11 मंत्र्यांच्या यादीत कुणाचा नंबर लागणार त्याकडे लक्ष्य लागून राहिलंय.
“कसबा पेठ मतदार संघ काॅंग्रेसकडे आणण्यासाठी मास्टर प्लॅन तयार”
उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांना यावेळी मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये खासदार प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, आणि शिंदे गटाचे लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे यांना संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण राहुल शेवाळे यांना केंद्रात मंत्रिपद देून आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुंबईत शिंदे गटाचे आणि भाजपचे हात बळकट करण्याचा हा प्रयत्न आहे.
Read also
- “माझं आजही गद्दारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका घ्याव्यात”, ठाकरेंनी बंडखोरांना डिवचलं
- “राजकारण सोडून दे, नाहीतर पेट्रोल पंपावर जाळून टाकू, मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन”,; करूणा मुंडेंची तक्रार
- भारतीय जुमला पार्टीचे प्रत्येक पाप जनतेपर्यंत पोहचवा..! काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाला सुरूवात
- मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची पुन्हा दिल्लीवारी…! मंत्रिमंडळाबाबत खलबत्त, बंडखोर आमदारांमध्ये नवचैतन्य
- “संजय राऊतांची आज पुन्हा कोर्टवारी….!” आज कोर्टात महत्वपुर्ण याचिकेवर सुनावणी