मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, बंडखोर आमदार, मुंबई, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजप यावर काल उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा तोप डागली. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईतील ष्णमुखानंद सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे सरकारवर जहरी टिका केली तसेच आजही माझं गद्दारांना आणि त्यांच्या राजकीय बापांना सांगणं आहे की त्यांनी लवकरात लवकर निवडणुका घ्या.. असं आवाहनही त्यांनी दिलं.
“कसबा पेठ मतदार संघ काॅंग्रेसकडे आणण्यासाठी मास्टर प्लॅन तयार”
पंतप्रधान नरेंद्र मोदी असले, तरी महाराष्ट्रात शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय भाजपला मते मिळू शकत नाहीत. हे मोदींनाही मान्य करावे लागले आहे. सध्या देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे हिंदूत्व वगैरे सगळं काही थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारावर धुक्याची एक भिंत उभी करायची आणि त्याच्या आडून देशावर पकड घट्ट बसावायची. असंही ठाकरेंनी कालच्या सभेत म्हटलं.
“घटनाबाह्य जितक्या कृती केल्या, त्याचे पापक्षालन राजीनाम्यामुळे होणार नाही”
अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौरा केला. त्यावेळी मोदींनी मुंबईतील महापालिकेमधील अनेक विकास कामाचं भूमीपूजन आणि पायाभरणी केली. त्यावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई ही त्यांना सोन्याची कोंबडी वाटते, त्यांना ती कापायची आहे. मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मराठी माणसाची मुंबई आपण त्यांच्या हाती जाऊ देणार नाही. ही कसली बाळासाहेबांची माणसं? आपल्या कामाचेच पंतप्रधानांनी भूमिपुजन केले. तीन वर्ष आम्ही काम केले म्हणून तुम्ही भूमिपूजन करू शकलात.
“काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीही सोबत येतील, त्यांच्याशी आमचं फक्त मुद्यांचे भांडण”; प्रकाश आंबेडकर
दरम्यान, आज सुभाषबाबूंचा, प्रमोद नवलकरांचा वाढदिवस आहे. तिकडे विधिमंडळात बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण होत आहे. परवा बाळासाहेबांचाच माणूस, काल मोदींचा माणूस आता पवारांचा सल्ला घेतो, मग मी काय घेत होतो? मोदी असले तरी बाळासाहेबांशिवाय तुम्ही कुणीच नाही हे तुम्हीच सिद्द केले. या महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही. असंही त्यांनी ठणकावून बंडखोरांना सांगितले.
Read also
- “राजकारण सोडून दे, नाहीतर पेट्रोल पंपावर जाळून टाकू, मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन”,; करूणा मुंडेंची तक्रार
- भारतीय जुमला पार्टीचे प्रत्येक पाप जनतेपर्यंत पोहचवा..! काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाला सुरूवात
- मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची पुन्हा दिल्लीवारी…! मंत्रिमंडळाबाबत खलबत्त, बंडखोर आमदारांमध्ये नवचैतन्य
- “संजय राऊतांची आज पुन्हा कोर्टवारी….!” आज कोर्टात महत्वपुर्ण याचिकेवर सुनावणी
- “उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंधे गटात अथवा भाजपात गेलेत तर नवल नाही”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा